Seed Germination Capacity : बियाणे उगवण क्षमता चाचण्यांवर बीजोत्पादकांचे प्रश्नचिन्ह

४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भडिमार
Seed Germination Capacity
Seed Germination CapacityAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः आम्ही वर्षानुवर्षे महाबीजसाठी (Mahabij) बीजोत्पादन (Seed Production) करीत आहोत. गेल्या काही हंगामात आमचे बियाणे सर्टीफिकेशनकडून (Seed Certification) नापास करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वास्तविक बियाण्याचा दर्जा उत्कृष्ट असतानाही प्रयोगशाळांमधून बियाणे नापास का ठरवले जात आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला.

Seed Germination Capacity
Seed Germination Test : घरीच तपासा बियाण्यांची उगवणक्षमता

या मुद्याभोवतीच प्रत्येक शेतकरी बोलत होता. ३१ डिसेंबरला महाबीजची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कृषी महाविद्यालयाच्या कमिटी सभागृहात झाली.
या वेळी राज्याचे प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. रणजित सपकाळ, संतोष आळसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Seed Germination Capacity
सिंदखेडराजा : गावोगाव बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक

भागधारक शेतकरी गजानन तात्या कृपाळ (जानेफळ) म्हणाले, बियाणे नापास होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले आहे. महाबीजने रिचेकींग युनिट उभारले पाहिजे. मेहकरमध्ये प्रक्रिया युनिट तयार करावे. महाबीजने डायरी बंद करू नये. गेल्या वर्षात शासनाने दिलेले १० कोटी रुपये भागधारकांना वाटप का केले नाहीत. खासगी कंपन्यांच्या तुलनेत महाबीज बियाण्याची किंमत कमी असू नये, असा सल्ला त्यांनी दिला.

गणेश कंडारकर (वाडेगाव) म्हणाले, सोयाबीन, हरभऱ्याचे बियाणे नापास का केले जाते हे कोडे बनले आहे. शेतकऱ्याने महाबीजला दिलेले बियाणे फेल तर खासगी कंपन्यांचे पास, असे अनाकलनीय कोडे तयार झालेले आहे. महाबीजच्या सीएसआर फंडातून भागधारक शेतकरी कुटुंबाच्या आरोग्यविषयक बाबींसाठी आर्थिक सहकार्य केले पाहिजे.
अॅड. सोळंकी (परभणी) म्हणाले, महाबीजची उलाढाल दरवर्षी कमी होत चालली आहे. या बाबत अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष द्यायला हवे.

महाबीज इतर कंपन्यांच्या तुलनेत मागे पडते आहे. कधीकाळी महाबीज कापूस बियाण्यात अग्रस्थानी होते. आज स्पर्धेतही नाही. पुन्हा अग्रस्थानी जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अधिकाऱ्यांना सेवानियम लागू करावेत. चुकीचे काम करणाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित व्हायला हवी. मराठवाड्यात परभणीमध्ये महाबीजचे कोल्डस्टोअरेज उभारावे.

महाबीजची सर्वसाधारण सभा अकोला मुख्यालयाशिवाय इतर जिल्ह्यातही झाली पाहिजे, असेही त्यांनी सूचवले.
शेषराव चापके (परभणी) म्हणाले, महाबीजने घेतलेले हरभरा बियाणे नापास ठरवल्या गेले आहे. ते नापास बियाणे महाबीजने थेट नाफेडला विकून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा. अॅड. दिलीप देशमुख (दारव्हा) यांनी महाबीजचा बीजोत्पादन कार्यक्रम भागधारकांनाच द्यावा, अशी मागणी केली.

ट्रुथफूल बीजोत्पादन घेण्याची मागणी --
शासकीय तपासणी प्रयोगशाळेत बियाणे फेल होण्याचे प्रमाण वाढल्याने बीजोत्पादकांचे अतोनात नुकसान होत आहे. महाबीजलाही याचा फटका बसतो आहे. खासगी कंपन्या ज्याप्रमाणे ट्रुथफूल बियाणे देतात, तसेच महाबीजनेही केले पाहिजे. यासाठी काही प्रमाणात ट्रुथफूल बियाणे प्लाॅट सुरू करण्याची मागणी सभासदांमधून आली.

कूपनचा मुद्दा गाजला ----
भागधारकांना महाबीजकडून दिलेले जाणारे डिस्काऊंट कूपन कृषी विक्रेत्यांकडून घेतले जात नाही. यामुद्यावरून भागधारकांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्याऐवजी नगदी मोबदला देण्याची मागणी केली. या मुद्यावर डवले यांनी संबंधिताबाबत तक्रार देण्याची सूचना करीत अशा विक्रेत्यांचा महाबीज विक्री परवाना रद्द करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.

सर्वसाधारण सभेतील मुद्दे ----
-सीड सर्टीफिकेशनच्या कार्यपद्धतीवर शंका
- नापास बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
- ट्रुथफुल बियाणे निर्मितीचे धोरण राबवावे
- महाबीजला पुन्हा मागचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com