Farm Produce Mortgage Scheme  Agrowon
ताज्या बातम्या

Farm Produce Mortgage Scheme : ‘शेतीमाल तारण’ चा ७५७ शेतकऱ्यांना लाभ

लातुरातील बाजार समित्यांना व्याजातून उत्पन्न

Team Agrowon

लातूर : पिकांच्या काढणीनंतर (Crop Harvesting) बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात शेतीमालाची (Farm Produce) आवक सुरू होते. त्यानंतर शेतीमालाचे भाव घसरतात.  तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी शेतकरी शेतीमालाची विक्री करतात. कालांत्तराने शेतीमालाचे भाव वाढतात. या भावाचा फायदा व्यापाऱ्यांनाच होतो. हा फायदा शेतकऱ्यांना करून देण्यासाठी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाने सुरू केलेल्या शेतीमाल तारण योजनेचा (Farm Produce Mortgage Scheme) लाभ जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी घेत आहेत. यातूनच सरलेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांनी (Market committee Latur) ७४७ शेतकऱ्यांना सुमारे नऊ कोटी ४३ लाख ७३ हजार ८८५ रूपये कर्जाचे वाटप केले आहे. यातील व्याजातून समित्यांना उत्पन्नाचे एक नवीन साधनही उपलब्ध झाले आहे.

जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) एस. आर. नाईकवाडी यांनी ही माहिती दिली. दरम्यान यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीनसाठी शेतीमाल तारण योजनेचा प्रारंभ बुधवारी (ता. ३) लातूर बाजार समितीच्या वतीने दोन ठिकाणी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. योजनेत शेतीमाल तारण ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीमालाच्या चालू बाजार भावाच्या ७५ टक्के कर्ज दरसाल दरशेकडा सहा टक्के व्याजाने सहा महिने मुदतीचे देण्यात येते. योजनेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो.

बाजार समित्यांना व्याजातून उत्पन्न
योजनेत कर्ज वाटप करण्यासाठी बाजार समित्यांना कृषी पणन मंडळाकडून मागेल तेवढा निधी देण्यात येतो. मात्र, जिल्ह्यात लातूर व उदगीरसह काही बाजार समित्यांकडे स्वतःचा निधी आहे. बहुतांश बाजार समित्या पणन मंडळाकडून निधी न घेता स्वतःच्या निधीतूनच योजनेतील कर्जाचे वाटप करत आहेत. निधी असताना पणन मंडळाकडून तो घेण्याची गरज नाही. यामुळे या योजनेतून बाजार समित्यांना व्याजाच्या उत्पन्नाचे चांगलेच साधन उपलब्ध झाले आहे. मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांनी स्वतःच्या निधीतून नऊ कोटी ४१ लाख १८ हजार ८८५ रूपयाचे कर्ज वाटप केल्याचे जिल्हा उपनिबंधक नाईकवाडी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT