Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : पुणे विभागात खरिपात ७१ टक्के पेरण्या उरकल्या

Team Agrowon

Pune News : जुलैच्या सुरवातीपासून झालेल्या हलक्या ते मध्यम पावसामुळे पेरणीचा टक्का वाढला आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरी दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी सात लाख ५१ हजार ३१४ हेक्टर म्हणजेच ७१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये पुणे, सोलापूर जिल्ह्यात पेरणी कमी असली तरी नगर जिल्ह्यात पेरणीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे.

जूनमध्ये नगर जिल्ह्यात सरासरीच्या १०८.२ मिलिमीटरपैकी ५८.० मिलिमीटर म्हणजेच ५३ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी ९०.८ मिलिमीटर म्हणजेच ५१ टक्के, तर सोलापूरमध्ये सरासरीच्या १०२.५ पैकी २८.८ मिलिमीटर पाऊस पडला. एक ते २७ जुलैपर्यंत नगरमध्ये ९०.५ मिलिमीटर, पुणे २४२.२, सोलापूरमध्ये १५७.९ मिलिमीटर पाऊस पडला.

यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसास सुरवात झाली. जुलैमध्ये पावसाने काही ठिकाणी दमदार हजेरी लावली. नगर जिल्ह्यात खरीप हंगामातील भात पिकाची अकोले तालुक्यामध्ये १ हजार ७५४ हेक्टर क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे. बाजरी व तूर पीक रोपे अवस्थेत आहे. मूग पीक रोपे व वाढीच्या अवस्थेत आहेत. उडीद रोपे, तर भुईमूग पीक उगवण अवस्थेत आहे. सोयाबीन, कापूस वाढीच्या अवस्थेत आहे.

पुणे जिल्ह्यात पाऊस सुरु झाल्याने भात पीक पुर्नलागवडीस वेग आला आहे. पूर्व भागात बाजरी पीक उगवण व वाढीच्या अवस्थेत आहे. सध्यस्थितीत सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत आहे. उशिराने सुरु झालेल्या पावसामुळे बाजरी पिकाची पेरणी सुरु आहे. मका पीक सद्यःस्थितीत उगवण व वाढीच्या अवस्थेत आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीप पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

जिल्हानिहाय झालेली पेरणी (हेक्टर)

जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- पेरणीचे क्षेत्र --- टक्के

नगर --- ५,७९,७६८ -- ४,८५,०६९ -- ८४

पुणे --- १,९५, ७१० -- १,०४, ८८२ --- ५४

सोलापूर --- २,८९,५७० -- १,६१,३६२ -- ५६

एकूण --- १०,६५,०४८ -- ७,५१,३१४ --७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Edible Oil Rate : तीस लाख टन साठा संपेपर्यंत खाद्यतेलाच्या किमती वाढवू नका

Vasantdada Sugar : ‘वसंतदादा शुगर’च्या धर्तीवर चालणार सिट्रस इस्टेटचा कारभार

Shwetkranti 2.0 : केंद्रीय मंत्री शहांच्या हस्ते ‘श्‍वेतक्रांती २.०’चा प्रारंभ

Bioenergy Production : जैवऊर्जा निर्मितीचा पहिला टप्पा फसला

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती

SCROLL FOR NEXT