Banana Rate Agrowon
ताज्या बातम्या

Banana Rate : खानदेशात केळीला ७०० ते १५०० रुपये दर

कांदेबाग केळीची काढणी पूर्णत्वाकडे; रोज १६० ट्रक आवक

Team Agrowon


ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात (Khandesh) चोपडा, जळगाव, जामनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागांतील कांदेबाग केळीची काढणी (Banana Harvesting) पूर्ण होत आली आहे. सध्या उशिरा लागवडीच्या बागांमध्ये काढणी सुरू आहे. कमी दर्जाच्या केळीला ७००, दर्जेदार केळीला १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

केळीची पाठवणूक मुंबई, नागपूर, छत्तीसगड, राजस्थान, उत्तरेकडील पंजाब, काश्मीर, दिल्ली आदी भागांत सुरू आहे. मुंबई, नागपूर, छत्तीसगड, राजस्थान येथे कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक केली जात आहे. या केळीला ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. दर्जेदार केळीची पाठवणूक पंजाब, दिल्ली येथील मॉल, काश्मीरमध्ये केली जात आहे. ज्या बागांत १० टनांपेक्षा अधिकची दर्जेदार केळी उपलब्ध होत आहेत, त्या बागांतील केळीला १५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिकचा दरही मिळत आहे.

सध्या केळीची आवक कमी होत आहे. ही आवक पुढे आणखी कमी होईल. कारण कांदेबाग केळी बागांमधील काढणी पूर्ण होईल. तसेच नवती केळीची काढणी फेब्रुवारीत सुरू होईल. सध्या खानदेशात प्रतिदिन १६० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. या आवकेत मागील १५ ते १८ दिवसांत २० ट्रकनी घट झाली आहे. यामुळे दर स्थिर आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही प्रतिदिन १५० ट्रक केळीची आवक सध्या होत आहे. तेथेही कमाल दर १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, यावल या भागांत कांदेबाग केळीची लागवड कमी किंवाअत्यल्प असते. यामुळे या भागात केळीची आवक कमी आहे. काश्मीर, दिल्ली, पंजाबमधील खरेदीदार यावल तालुक्यातील फैजपूर, रावेरातील सावदा व परिसरातील एजंटच्या मदतीने केळीची चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर व इतर भागांतून खरेदी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT