Ginger Rate Agrowon
ताज्या बातम्या

Ginger : तारळी नदीत आल्याची ७०० पोती गेली वाहून

कराड तालुक्यातील इंदोली गावच्या हद्दीत नदीवर आले धुवायला गेलेल्या दोन शेतकऱ्यांची सुमारे आल्याची ७०० पोती अचानक तारळी नदीला पाणी वाढल्याने वाहून गेली.

टीम ॲग्रोवन

सातारा : कराड तालुक्यातील इंदोली गावच्या हद्दीत नदीवर आले धुवायला गेलेल्या दोन शेतकऱ्यांची सुमारे आल्याची (Ginger) ७०० पोती अचानक तारळी नदीला (Tarali Ricer) पाणी वाढल्याने वाहून गेली. यामध्ये सुमारे २० लाखांपेक्षा जास्त नुकसान (Farmer's Loss) झाल्याची घटना शनिवारी (ता. १०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली आहे.

जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगफुटीसदृश पाऊस होत असल्याने नदी, नाले, ओढ्याच्या पाणीपातळीत अचानक वाढ होत आहे. शनिवारी असाच पाऊस झाल्याने दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की पेरले (ता. कराड) येथील शेतकरी विक्रमसिंह गुलाबराव कदम यांनी शेतातून काढलेले ६०० पोती आले पीक (४० ते ४२ किलो वजनाची) व काशीळ (ता.

सातारा ः येथील शेतकरी युवराज लक्ष्मण जाधव यांचे १०० पोती आले पीक ट्रॅक्टरमधून धुण्यासाठी इंदोली येथील तारळी नदीपात्रात सकाळी अकराच्या सुमारास आणले होते. या वेळी ७० कर्मचारी हे आले धुऊन पोत्यात भरण्याचे काम सुरू होते. दुपारच्या सुमारास तारळी नदीच्या परिसरात अचानक पाऊस पडल्याने दुपारी २ वाजता तारळी नदी पात्र भरून वाहू लागली.

पाण्यात अचानक वाढ झाली. या दरम्यान नदीपात्रात दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे ७०० पोती आले ट्रॅक्टरसह ट्रॉली नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना समजताच घटनास्थळी धाव घेऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT