Cotton Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Farming : खानदेशात पूर्वहंगामी कापसाची ७० टक्के लागवड पूर्ण

Cotton Market : खानदेशात पूर्वहंगामी कापसाची लागवड सुमारे ७० टक्के पूर्ण झाली आहे. पुढील चार ते पाच दिवसात पूर्वहंगामी कापसाची लागवड ९० टक्क्यांवर जाईल.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पूर्वहंगामी कापसाची लागवड सुमारे ७० टक्के पूर्ण झाली आहे. पुढील चार ते पाच दिवसात पूर्वहंगामी कापसाची लागवड ९० टक्क्यांवर जाईल. यंदा कापूस बियाण्यांचा काळाबाजारही वेगात सुरू आहे.

खानदेश कापूस पिकासाठी प्रसिद्ध आहे. जळगावात राज्यात सर्वाधिक पाच लाख ५० हजार ते पाच लाख ७० हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते.

मे महिन्यात अधिकृतपणे कापूस बियाणे विक्रीस परवानगी नसल्याने अनेकांनी मध्य प्रदेश, गुजरातमधील बियाणे घेतले. काळाबाजार वेगात झाला.

यातच अपेक्षित दोन लाख हेक्टर एवढ्या पूर्वहंगामी कापूस लागवडीखालील क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्रात लागवड पूर्ण झाल्याची माहिती आहे. यामुळे १ जूनपासून कापूस बियाणे विक्री व गुलाबी बोंड अळी नियंत्रण कार्यक्रमाचा फज्जा झाल्याचेही दिसत आहे.

खानदेशात एकूण साडेआठ लाख हेक्टरवर कापूस लागवड यंदा अपेक्षित आहे. यातील सुमारे दोन ते सव्वादोन लाख हेक्टरवर पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवड ५ जूनपर्यंत पूर्ण केली जाते.

अनेकांनी मे मध्ये लागवड सुरू केली. पण राज्यात अधिकृतपणे कापूस बियाणे वितरण व विक्रीस १ जूनपर्यंत परवानगी नव्हती. यामुळे शेतकऱ्यांनी काळ्याबाजारातून कापूस बियाणे खरेदी केले.

एचटीबीटी, बोलगार्ड ४ व ५ यांची अवैध विक्री खानदेशात यंदाही थांबू शकली नाही. यामुळे बंधने, १ जूनपासून कापूस विक्री या बाबी फक्त देखावा असल्याची टिकाही होत आहे. धुळे, शिरपूर, शिंदखेडा, जळगावात यावल, चोपडा, पारोळा, अमळनेर, मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव, जळगाव आदी तालुक्यात लागवड १२ मे नंतर सुरू झाली. अनेकांचे कापूस पीक आंतरमशागतीवर आले आहे.

१ जूनचा आदेश काय उपयोगाचा

खानदेशात पूर्वहंगामी लागवड पूर्वीदेखील एप्रिलअखेर सुरू व्हायची. ती अलीकडे मेच्या मध्यात सुरू होते. लवकर लागवड करून पुढे लवकर क्षेत्र रिकामे करायचे आणि नोव्हेंबरमध्ये कापसाखालील क्षेत्र रिकामे करून त्यात रब्बीची पेरणी करायची, असे नियोजन कापूस उत्पादक सुरवातीपासून करतात.

शिवाय गुलाबी बोंड अळीचा प्रकोप मेच्या मध्यात लागवड केलेल्या कापूस पिकात सुरवातीला फारसा नसतो. दिवाळीनंतर गुलाबी बोंड अळी अधिक दिसते. तोपर्यंत पहिल्या तीन वेचण्या आटोपतात.

यामुळे नुकसान कमी होते. तसेच १ जूननंतर कापूस लागवड करूनही गुलाबी बोंड अळीचा प्रकोप होतच आहे. यामुळे १ जूनपासून कापूस बियाणे विक्री व लागवड याबाबत शेतकऱ्यांमध्ये विश्वास तयार झालेला नाही, असेही चर्चिले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT