Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Electricity Connection : मराठवाड्यात चार महिन्यांत ५९ हजार नवीन वीजजोडण्या

Agriculture Electricity : महावितरण वीज ग्राहकांना तत्पर वीज सेवा देण्याबरोबरच मागेल त्यांना वीजजोडणी देण्यासाठी सज्ज आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : महावितरण वीज ग्राहकांना तत्पर वीज सेवा देण्याबरोबरच मागेल त्यांना वीजजोडणी देण्यासाठी सज्ज आहे. याचाच भाग म्हणून महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालय अंतर्गत मराठवाड्यात एप्रिल २०२३ ते जुलै २०२३ या कालावधीत गेल्या चार महिन्यांत सर्व वर्गवारीतील ५९ हजार ४५४ ग्राहकांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नव्या वीजजोडणीसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. ग्राहकांनी नव्या वीजजोडणीसाठी अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात.

त्यानुसार पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी शहरी भागातील ज्या ग्राहकांनी शुल्क भरले त्यांना चोवीस तासांत, तर ग्रामीण भागात ४८ तासांत वीजजोडणी देण्यावर भर देण्यात आला. वीजजोडणी आवश्यक असल्यास त्या ठिकाणच्या जागेवर वीजबिलाची थकित थकबाकी नसली पाहिजे.

वीज चोरीचा दंड प्रलंबित असू नये. नवीन वीजजोडणीसाठी दलाल अथवा मध्यस्थाशी संपर्क साधू नये व त्यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. नागरिकांनी वीजजोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे.

मंडल कार्यालय नवीन जोडण्या

छत्रपती संभाजीनगर शहर ६ हजार ५८९

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ९ हजार ७९९

जालना ५ हजार ८८०

छत्रपती संभाजीनगर परिमंडल २२ हजार २६८

बीड ६ हजार ७११

धाराशिव ४ हजार ८८८

लातूर ९ हजार १३२

लातूर परिमंडल २० हजार ७३१

हिगोंली ३ हजार ३२

नांदेड ८ हजार ८०६

परभणी ४ हजार ६१७

नांदेड परिमंडल १६ हजार ४५५

मराठवाडा एकूण ५९ हजार ४५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr Panjabrao Deshmukh Memorial Award: डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्र्यांना जाहीर

Kharif Onion Cultivation: लेट खरीप कांद्याची लागवड यंदा अडीच लाख हजार हेक्टरवर

APMC Reforms: ‘बाजार व्यवस्थेवर आता सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण’

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’च्या जमीन खरेदी-विक्रीला स्थगिती

Market Committee Democracy: पणनमंत्र्यांकडील अध्यक्षपद बाजार समित्यांच्या मुळावर: राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT