agricultural service center  agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season 2023 : नागपूरातील ५४ कृषी सेवा केंद्र सील, कृषी विभागाची धडक कारवाई

Agricultural Service Centers : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागपूरमध्ये ५४ कृषी सेवा विक्री दुकानांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Team Agrowon

Fake Seeds Fertilizers : खरीप हंगामाची सर्वत्र तयार सुरू आहे. हंगामाच्या तोंडावर बोगस बियाणे आणि निकृष्ट दर्जाची रासायनिक खते आणि कीटकनाशकांची विक्री होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. या पार्श्वभूमीवर नागपूर कृषी विभागाने कृषी सेवा केंद्र तपासणी मोहीम सुरू केली. यामध्ये जिल्ह्यातील ५४ कृषी सेवा केंद्रावर धडक कारवाई करण्यात आली.

यामध्ये बोगस बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या २९ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले तर २५ दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे, खत व कीटकनाशकांची विक्री होत असते. त्यामुळे कृषी विभाग,जिल्हा परिषदे कृषी विभागाच्या ४० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी नागपूर जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर १३ असे एकूण १४ भरारी पथक स्थापन करण्यात आले. या पथकामार्फत ३ बियाणे उत्पादक आणि ४३४ कृषि सेवा केंद्रांची आकस्मिक तपासणी केली.

तपासणी पथकाने धडक कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या बियाणांचे १४३, रासायनिक खतांची १३७ आणि कीटकनाशकांचे २५ नुमने तपासणीसाठी घेतले. ते प्रयोगशाळेत पाठवले. यापैकी खतांचे १३, बियाणे व कीटकनाशकाचा प्रत्येकी एक नमुना अप्रमाणित आढळून आले. गुणवत्ता नियंत्रण मानकांची पूर्तता न केल्याने एकूण २५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले तसेच २९ कृषी सेवा केंद्राना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बोगस बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या विक्रीबाबत शेतकऱ्यांची तक्रार असल्यास तक्रार निवारण कक्ष : संपर्क क्रमांक -८८३०२९०८८७ किवा टोल फ्री क्रमांक – १८००२३३४००० वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT