कृषी सेवा केंद्र बंदमुळे खरिपाच्या तयारीत अडथळे

खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यात पुकारलेल्या लॉकडाउनच्या निर्बंधात कृषी निविष्ठा विक्रीच्या दुकानांचाही समावेश केला आहे. त्यामुळे खरीप हंगामात अडथळे येत आहेत.
  कृषी सेवा केंद्र बंदमुळे खरिपाच्या तयारीत अडथळे Due to closure of agricultural service center Obstacles to kharif preparations
  कृषी सेवा केंद्र बंदमुळे खरिपाच्या तयारीत अडथळे Due to closure of agricultural service center Obstacles to kharif preparations
Published on
Updated on

कोल्हापूर : खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यात पुकारलेल्या लॉकडाउनच्या निर्बंधात कृषी निविष्ठा विक्रीच्या दुकानांचाही समावेश केला आहे. त्यामुळे खरीप हंगामात अडथळे येत आहेत. दर वर्षी अक्षय्य तृतीयेनंतर खरीप हंगामाच्या विविध पिकांच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होते.  सध्या शासनाच्या निर्बंधात कृषी सेवा केंद्रे व शेतीशी निगडित इतर कामे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे सुरू आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात स्वतंत्रपणे कडक लॉकडाउन केला आहे. यामध्ये कृषी निविष्ठा दुकाने बंद केली आहेत. मुळात लॉकडाउनमुळे शेतकऱ्याचा भाजीपालाही तसाच पडून राहत आहे. आता खरिपाच्या तोंडावर कृषी सेवा बंद करून शेतकऱ्यांवरच संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे.   जिल्ह्याच्या पश्चिम भागात मे अखेरपर्यंत २५ टक्क्यांच्या आसपास भाताच्या धूळवाफ पेरण्या होतात; परंतु दुकाने बंदमुळे बियाणे खरेदीत अडचण आली असून, ही पेरणी खोळंबण्याची भीती आहे. कृषी सेवा केंद्रांकडे सोयाबीन उपलब्ध असले तरी दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. डिसेंबर-जानेवारीत कृषी सेवा केंद्र चालक बियाणांची मागणी नोंदवितात. त्याचवेळी कंपन्या त्यांच्याकडून टोकन रक्कम भरून घेतात. त्याद्वारे दुकानदारांची लाखो रुपये गुंतवणूक होत असते. यंदा आधीच पैसे भरून घेऊनही आतापर्यंत केवळ ३० टक्केच बियाणे दिले आहेत. पैसे आगाऊ देऊनही मुबलक बियाणे मिळालेले नाहीत. त्यातच आता लॉकडाउनमध्ये दुकाने बंद केल्याने उपलब्ध बियाणांचीही विक्री थांबली आहे. त्यामुळे दुकानदारांना आर्थिक फटका बसणार आहे. बांधावर बियाणे देण्याचा सल्ला प्रशासन देत असले तरी विविध प्रकारचे बियाणे बांधावर नेण्यात अडचणी आहेत. गावागावांत लॉकडाउन पुकारल्याने प्रवेश बंदी केली आहे. अशा परिस्थितीत बियाणे विकायचे कसे, असा प्रश्‍न आहे. भाताच्या पेरण्या रखडणार जिल्ह्याच्या अनेक भागात मे महिन्याच्या अखेरीस भाताच्या धूळवाफ पेरण्या होतात. मात्र लॉकडाउनमुळे यंदा भाताचे बियाणेच उपलब्ध नाही. त्यामुळे या पेरण्या होण्याची शक्यता कमी आहे. किंवा ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे आहे, ते शेतकरी पेरणी करू शकतील. या शिवाय बाजार समित्या बंद असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल घरातच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात पैसेही नसल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया

खरीप हंगाम काही दिवसांवर आला आहे. शेतीच्या मशागतीची लगबग सुरू आहे. रोहिणी नक्षत्राच्या वाफशावर पेरण्यासाठी बियाणे उपलब्ध होणे गरजेचे आहे. अशा कालावधीत कृषी सेवा केंद्र दुकान बंद असल्याने आम्हास बियाणे उपलब्ध होऊ शकत नाही. शासनाने कृषी सेवा केंद्रांना निर्बंधातून वगळावे. बळी पाटील, शेतकरी, मलकापूर

प्रतिक्रिया

कोरोना बाबतच्या नियमांचे पालन करून कृषी सेवा केंद्र चालकांना खरीप हंगामासाठी परवानगी मिळावी, यासाठी शासन स्तरावर विचार विनिमय होणे गरजेचे आहे. -संतोष कुंभार, कृषी सेवा केंद्र चालक, मलकापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com