Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : यवतमाळला नुकसानीच्या मदतीसाठी हवे ५३८ कोटी

यवतमाळ : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या भरपाईपोटी शासनाने मदतीसाठी सुधारित आदेश काढले आहेत. आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेत भरपाई दिली जाणार आहे.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या भरपाईपोटी (Heavy Rain Damage Compensation) शासनाने मदतीसाठी सुधारित आदेश काढले आहेत. आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेत भरपाई दिली जाणार आहे. त्यानुसार करण्यात आलेल्या फेर सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात बाधित क्षेत्र एकूण खरीपाच्या (Kharif Crop Damage) पावणे ९ लाख हेक्टरपैकी चार लाख हेक्टरवर पोहोचले आहे.

जिल्ह्याचे एकूण खरीप लागवड क्षेत्र ९ लाख हेक्टर आहे. त्यापैकी पावणे पाच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होते. काही वर्षात कापूस उत्पादकांना बोंड अळी व बोंडसडचा सामना करावा लागत आहे. यंदा पीक परिस्थिती समाधानकारक राहण्याची अपेक्षा होती; मात्र जुलैमधील संततधारेने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ९५ मंडलांत अतिवृष्टी झाली. दहा वेळा मंडलांत नुकसान झाले.

कृषी विभागाकडून सुधारित आदेशानुसार फेरसर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार बाधित क्षेत्र चार लाख हेक्टरवर पोहोचले. कापसाचे सर्वाधिक नुकसान आहे. तब्बल २ लाख ३३ हजार ४०४ हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान झाले. १ लाख २० हजार १२७ हेक्टरवरील सोयाबीनलाही फटका बसला. अतिवृष्टीमुळे तुरीचे अर्धे क्षेत्र बाधित झाले. ते ४१ हजार हेक्टर आहे. ३३४ हेक्टरवर ज्वारी, १४७ हेक्टर मूग, १३५ हेक्टर उडीद, २६१ हेक्टर भाजीपाला, सात हेक्टर हळद, दोन हेक्टर आंबा, १० हेक्टर संत्रा, २१ हेक्टर मोसंबी, तर दोन एकर लिंबाचे नुकसान झाले.

तालुकानिहाय लागणारा निधी

यवतमाळ १२ कोटी ८५ लाख

कळंब १९ कोटी ६१ लाख

घाटंजी ४१ कोटी ७८ लाख

राळेगाव ५२ कोटी २२ लाख

दारव्हा १५ लाख ३४ हजार

नेर २० कोटी १८ लाख

आर्णी ३५ कोटी ८९ लाख

बाभूळगाव सात कोटी ४२ लाख

पुसद २७ कोटी २७ लाख

दिग्रस २७ कोटी ३९ लाख

उमरखेड ४४ कोटी ३२ लाख

महागाव ३३ कोटी ६२ लाख

पांढरकवडा ५६ कोटी ५३ लाख

वणी ७३ कोटी ३९ लाख

मारेगाव ४५ कोटी ५१ लाख

झरी ४० कोटी ३० लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

Postal Votes : पोस्टल मतांनी पटोलेंना तारले

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

SCROLL FOR NEXT