Koyna Dam Satara agrowon
ताज्या बातम्या

Koyna Dam : कोयना धरणात ५१ टीएमसी पाणीसाठा

Kolhapur Rain Update : कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणात २४ तासांत ५.१७ टीएमसीने वाढ झाली आहे.

Team Agrowon

Satara News : कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणात २४ तासांत ५.१७ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात ५१.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यात सरासरी २५.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना १५०, नवजा २०१ व महाबळेश्वर १८५ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात प्रतिसेकंद ५९,८५१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात २४ तासांत ५.१७ टीएमसीने वाढ होऊन धरणात ५१.९३ टीएमसी म्हणजेच ४९.३३ टक्के धरण पाण्याने भरले आहे.

इतरही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर, जावळी, पाटण, सातारा, वाई, कऱ्हाड तालुक्यांत पावसाची रिपरिप सुरू आहे. रविवारी (ता. २३) सायंकाळी पावसाचा जोर वाढला आहे. पूर्वेकडील माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा तालुक्यांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. फलटण तालुक्यात तुरळक पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे...

सातारा २३.५, जावळी ४४.०, पाटण ६६.३, कराड २०.२, कोरेगाव ८.६, खटाव ६.९, माण ६.१, फलटण १.२, खंडाळा ६.२, वाई -१९.३, महाबळेश्वर १०४.४ असा एकूण २५.४ मिमी पाऊस झाला आहे.

कोयनेतून विसर्ग

कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठ्यात आवक होत आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाकडून सोमवारी (ता.२४) चार वाजता पायथा वीज गृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच धोम-बलकवडी धरणातून २२९८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT