Cotton Soybean Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : सोयाबीन, कापसाला ५० हजारांचे विमा संरक्षण

Soybean Crop Insurance : पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगिन करून किंवा नजीकच्या CSC/VLE केंद्रात निव्वळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते.

Team Agrowon

Nashik News : खरीप हंगामात पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना २०२३ मध्ये लागू केली आहे. त्याअंतर्गत सोयाबीन व कापूस या पिकांना ५० हजारांचे पीकविमा संरक्षण मिळणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी कळविले आहे.

पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगिन करून किंवा नजीकच्या CSC/VLE केंद्रात निव्वळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते.

तसेच जिल्ह्यात ओरिएण्टल इंन्शुरन्स या कंपनीची पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत नियुक्ती केली आहे. भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका ही तृणधान्य व कडधान्य तसेच भुईमूग, कारळा, सोयाबीन ही गळीत धान्य पिके आणि कापूस खरीप कांदा ही नगदी पिके अधिसूचित केलेल्या क्षेत्रात लागू राहतील.

पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग इत्यादी बाबींमुळे आणि हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट तसेच खरीप हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान किंवा हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागवड न झाल्याने होणाऱ्या नुकसानीचा विम्यात समावेश आहे.

त्याचप्रमाणे पिकाच्या काढणीनंतर नुकसान झाल्यासदेखील शेतकऱ्यांना भरपाई देण्यास विमा कंपनी बांधील असणार आहे. पात्र लाभार्थी कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना ऐच्छिक असली तरी या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सोनवणे यांनी केले.

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम

पीक रक्कम (रुपये प्रति. हेक्टर)

मका ३५ हजार ५९८

कापूस ५० हजार

सोयबीन ५० हजार

बाजरी २७ हजार ५००

तूर ३६ हजार ८००

मूग २२ हजार ५००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT