Grape Season
Grape Season Agrowon
ताज्या बातम्या

Grape Market : बिहारच्या द्राक्ष व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना ५० लाखांचा गंडा

Team Agrowon

Grape Season वणी, जि. नाशिक : दिंडोरी तालुक्यातील सहा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून (Grape Farmer) सुमारे पन्नास लाखांचे द्राक्ष खरेदी (Grape Procurement) करून परप्रांतीय व्यापारी फरारी झाला आहे. या बाबत हस्तेदुमाला (ता. दिंडोरी) येथील गणेश पोपट महाले (वय ४९) यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांत फसवणुकीचा (Fraud with Grape Farmer) गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, की श्री. महाले यांचे हस्तेदुमाला शिवारात शेत गट क्र. २९०मध्ये चार एकर क्षेत्रात सोनाका वाणाचे द्राक्ष पीक आहे. या द्राक्ष बागेचे उत्पन्न चांगले असल्याने माळेफाटा येथे राहणारा द्राक्ष व्यापारी मोहम्मद अन्वर (रा. सीतामढी, बिहार) याने द्राक्षमाल पाहिला व मालाची खात्री झाल्याने गावातीलच दीपक उत्तमराव महाले यांच्या समक्ष द्राक्ष मालाचा ३७ रुपये प्रतिकिलो भावाने व्यवहार केला.

त्यानंतर १३ फेब्रुवारीस त्याने माल खुडण्यास सुरुवात करून रोज माल पाठवून १७ फेब्रुवारीपर्यंत एकूण ७ लाख ६९ हजार सहाशे रुपये किमतीचा २०८ क्विंटल सोनाका द्राक्ष माल खरेदी केला.

माल खुडल्यानंतर या व्यापाऱ्याकडे वारंवार पैशासाठी मागणी केली असता, त्याने टाळाटाळ करत पैसेही दिले नाहीत किंवा धनादेशही दिला नाही.

दरम्यान, २४ फेब्रुवारीला श्री. महाले हे पैसे घेण्यासाठी माळेफाटा येथील व्यापाऱ्याच्या रूमवर गेले असता, त्याने कपडे व साहित्यासह पलायन केल्याचे निदर्शनास आले. त्याने दिलेला मोबाईल नंबरही बंद असल्याने त्याच्या ठावठिकाणाबाबत सुगावा लागला नाही.

अन्य शेतकऱ्यांचीही फसवणूक

दरम्यान, गणेश महाले यांच्याप्रमाणेच रामदास शंकर निरगुडे (रा. मावडी) यांचा २०३ क्विंटल सोनाका माल प्रतिकिलो ३४ रुपयेप्रमाणे ७ लाख ३ हजार ८५२ रुपये, उत्तम बाबूराव महाले (रा. माळेदुमाला) यांचा ५७२ क्विंटल सोनाका माल ४३ रुपये प्रतिकिलो या भावाने एकूण १७ लाख ७० हजार रुपये, रवींद्र मुरलीधर ठाकरे (रा. संगमनेर, ता. दिंडोरी) यांचा १५२ क्विंटल थॉमसन जातीचा माल ५७ रुपये किलोप्रमाणे एकूण ५ लाख ४७ हजार रुपये,

मंगेश रघुनाथ घुगे (रा. माळेदुमाला) यांचा सोनाका जातीचा १३८.५७ क्विंटल द्राक्षमाल ४० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे ५ लाख २४ हजार ४०० रुपये, तसेच गोरख गोविंदराव जाधव (रा. कोकणगांव) यांचा सोनाका जातीचा १५६.७० क्विंटल द्राक्षमाल ४१ रुपये प्रतिकिलोप्रमाणे एकूण ६ लाख ४ हजार २०० रुपये अशा सहा शेतकऱ्यांचा ४९ लाख १९ हजार ०५२ रुपये किमतीचा द्राक्षमाल खरेदी करून कोणासही धनादेश अगर पैसे न देता हा व्यापारी पळून गेला आहे. या संदर्भात मोहम्मद अन्वर याच्याविरूद्ध वणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

Turmeric Processing : विडालय टरमरीक प्रोसेसींग क्‍लस्टरसाठी दहा कोटींची तरतूद

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

SCROLL FOR NEXT