
Grape Market Update नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik APMC) पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील ट्रान्सपोर्टमधून सुमारे १० लाखांचे द्राक्ष माल (Grape Market) भरून परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला.
याप्रकरणी संशयित रमणजित सिंग सिंधू, जकतार सिंग, विक्रमजित सिंग या संशयितांविरोधात पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करणजित सिंग कुलदीपसिंग औलक (रा. प्रेरणा बंगला, विधातेनगर, हिरावाडी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे शरदचंद्र पवारमार्केट यार्डात ट्रान्सपोर्टचे दुकान गाळा नं. ५ येथे आहे. गेल्या २१ ते २५ तारखेदरम्यान, त्यांनी दुकानात काळ्या व हिरव्या द्राक्षांचा माल भरलेला होता.
ट्रक मालक जकतार सिंग व विक्रतजित सिंग आणि ट्रकचालक रमणसिंग यांनी संगनमताने व्यापारी औलक यांचा विश्वास संपादन करून ट्रकमध्ये (पीबी १० एचइ ८५१३) ७ लाख १८ हजार ५०० रुपयांचा काळ्या द्राक्षांचे ९५८ कॅरेट,१ लाख ८६ हजार ७५० रुपयांचा हिरव्या द्राक्षांचा ४१५ कॅरेट,
१ लाख ३७ हजार ३०० रुपयांचे १३७३ प्लॅस्टिकचे कॅरेट माल असा १० लाख ४२ हजार ५५० रुपयांचा माल भरला आणि त्याची परस्पर विक्री केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक देवरे हे पुढील तपास करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.