औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ५५ कारखान्यांनी यंदाच्या गाळप (Sugarcane Crushing) हंगामात सहभाग घेतला आहे. या कारखान्यांनी ४९ लाख २ हजार २३३ टन उसाचे गाळप करत ४१ लाख ३७ हजार ९३५ क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) केले आहे.
गतवेळच्या कामात मराठवाड्यात शिल्लक उसाचा प्रश्न चांगलाच कळीचा बनला होता. कारखान्यांचा गाळप हंगामही मागे पुढे सुरू झाला होता. यंदाच्या गाळप हंगामात मात्र ऊसगाळप गतीने सुरू झाल्याचे दिसते आहे.
गाळप हंगामात आजवर सहभाग घेतलेल्या कारखान्यांमध्ये औरंगाबादमधील ७, जालन्यातील ५, बीडमधील ६, लातूरमधील ७, उस्मानाबादमधील १२, परभणीतील ७, हिंगोलीतील ५ व नांदेडमधील ६ कारखान्यांचा समावेश असल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.
नांदेड विभागात १८ लाख टनाचे गाळप
नांदेड विभागातील कारखान्यांनी १८ लाख ७२ हजार २३९ टन उसाचे गाळप झाले आहे. तर, १६ लाख ४८ हजार ७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल यांनी दिली.
जिल्हानिहाय ऊसगाळप स्थिती
जिल्हा ऊसगाळप (टनांत) साखर उत्पादन (क्विंटल) उतारा
औरंगाबाद ४१९१२६ ३७५१७० ८.९५
जालना ४५४७०५ ३८८१८५ ८.५४
बीड ६०६२५५ ४०६३६० ६.७
लातूर ६८२२०० ६०५३४० ८.८७
उस्मानाबाद १४६९८०१ १२४२६६५ ८.५
परभणी ४८११३४ ३९६५४० ८.२४
हिंगोली ३५६६६८ ३३८५५० ९.४९
नांदेड ४३२३४४ ३८५१२५ ८.९१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.