Sugarcane Transport : इंदापूर शहरातून धोकादायक ऊस वाहतूक

शहरातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावर धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक होत असून, याकडे पोलिस प्रशासनासह आरटीओचेही दुर्लक्ष असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह परिसरात दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत.
Sugarcane Transport
Sugarcane TransportAgrowon
Published on
Updated on

इंदापूर ः शहरातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Highway) धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक (Sugarcane Transport) होत असून, याकडे पोलिस प्रशासनासह आरटीओचेही दुर्लक्ष असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह परिसरात दररोज अपघाताच्या (Road Accident) घटना घडत आहेत. याबाबत तत्काळ कार्यवाही करून बाह्यवळण मार्गाने ऊस वाहतूक सुरू ठेवावी, अशी मागणी इंदापूर शहरवासीयांमधून होत आहे.

Sugarcane Transport
Sugarcane Trash : उसाचे पाचट न जाळण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

दरम्यान, गुरुवार (ता.०८) रोजी सायंकाळी इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाका परिसरात उसाने भरलेली ट्रॉली अचानक उलटली. ट्रॉलीत क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरलेला होता. तसेच, जोरदार वेगाने ट्रॅक्टर पळविला जात होता. सुदैवाने अपघात झाला तेव्हा ट्रॅक्टरमधील कोणीही जखमी झाले नाही. मात्र ऊस रस्त्यावर पसरल्याने संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.

Sugarcane Transport
Sugarcane FRP : ‘एफआरपी’बाबतचे गोड गैरसमज

सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. इंदापूर शहरातून पुणे-सोलापूर महामार्ग अवजड वाहनांना बाह्यवळण महामार्गाचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या असताना दिवस-रात्र इंदापूर शहरातून बेकायदेशीरपणे ऊस वाहतूक करणारे शेकडो वाहने भरधाव वेगाने जात असतात.

भरधाव वेग, ट्रॉलीत प्रमाणापेक्षा जास्त आणि निष्काळजीपणे भरलेला ऊस, विनापासिंग ट्रॉलीचा वापर, वाहतूक नियमांचे उल्लंघन, पुरेशा खबरदारीचा अभाव, शिकाऊ ट्रॅक्टर चालकांकडून सदोष वाहतूक, आरटीओ, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष अशा एक ना अनेक कारणांमुळे इंदापूर शहरातून होणाऱ्या ऊस वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

यापूर्वीही अशा अनेक घटना इंदापूर शहरात घडल्या आहेत. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आणि बघ्याची भूमिका इंदापूरकरांच्या जीविताला धोका निर्माण करीत आहे. प्रशासनाने याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी इंदापूरवासीयांकडून केली जात आहे.

जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास

शहरातील पुणे-सोलापूर महामार्गावर शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, बसस्थानक, पोलिस स्टेशन, आठवडे बाजार आणि अनेक शासकीय व खासगी दवाखान्यांमुळे हजारो नागरिकांच्या विशेषतः: विद्यार्थ्यांची, वृद्धांची नेहमी वर्दळ असते. मात्र बेकायदेशीर व धोकादायक ऊस वाहतुकीमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालण्याचा धोका पत्करावा लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com