Rabi Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Crop Loan : रब्बीत शेतकऱ्यांना ४५ टक्के कर्जवाटप

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) रब्बी हंगामासाठी ५९४ कोटी ५ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Team Agrowon

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) रब्बी हंगामासाठी (Rabi season ) ५९४ कोटी ५ लाख रुपयांचे पीककर्ज (Crop Loan) वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत २७३ कोटी १७ लाख ८५ हजार रुपये म्हणजेच ४५ टक्के कर्जवाटप (Crop Loan Distribution) केले आहे. याशिवाय दुग्धव्यवसाय, (Daiy Business) मत्स्यव्यवसायासाठी (Fisheries) चार कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले असल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी बँकेने रब्बीसाठी एकूण ५८० कोटी ६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पीक कर्जात जवळपास १४ कोटीने वाढ केली असून, गेल्या वर्षी याच काळात २६५ कोटी ४३ लाख ८५ हजार रुपये म्हणजेच ४५ टक्के वाटप झाले होते. यंदा शेतकऱ्यांना पीककर्जासाठी फारशा अडचणी येणार नसल्याचे बॅँकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन रब्बीचे नियोजन करून पिके घेतात.

गावपातळीवरील शाखांमार्फत कर्जाचे वाटप

पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या ३०० शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १३०६ विविध कार्यकारी सहकारी सोसायटींना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. सध्या बँकेकडून तीन लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. तर, तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने कर्जवाटप केले जात आहेत.

विविध पिकांना दिले जाते कर्ज

रब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांना पीककर्जाचे वाटप केले जाते. त्यामुळे दर वर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

बँकेकडून रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामाचे नियोजन करून पिके घेतात.

तालुकानिहाय पीककर्जाचे वाटप

तालुका झालेले वाटप (रुपयांत)

आंबेगाव ५० कोटी ५२ लाख ४६ हजार

बारामती १३ कोटी ६३ लाख ६९ हजार

भोर १३ कोटी ५३ लाख ५ हजार

दौंड ११ कोटी ५१ लाख ९९ हजार

हवेली ५ कोटी ४४ लाख १० हजार

इंदापूर १८ कोटी ८६ लाख ६ हजार

जुन्नर ५३ कोटी १० लाख १७ हजार

खेड ४९ कोटी ७० लाख ६३ हजार

मावळ ५ कोटी ५७ लाख ४३ हजार

मुळशी १३ कोटी ९९ लाख ६० हजार

पुरंदर २३ कोटी ९५ लाख ९० हजार

शिरूर ९ कोटी ५७ लाख १७ हजार

वेल्हा ३ कोटी ७५ लाख ६० हजार

एकूण २७३ कोटी १७ लाख ८५ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT