Seed Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Seed : नगर जिल्ह्यात ४५ टक्के खरीप बियाणे पडून

Kharif Season 2023 : आतापर्यंत उपलब्ध बियाण्यांपैकी ४५ टक्के बियाणे पडून आहेत. उपलब्ध खतांपैकी आतापर्यंत केवळ १२ टक्के खताची विक्री झाली आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या होण्याला अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम खते, बियाणे विक्रीवरही झाला आहे. आतापर्यंत उपलब्ध बियाण्यांपैकी ४५ टक्के बियाणे पडून आहेत. उपलब्ध खतांपैकी आतापर्यंत केवळ १२ टक्के खताची विक्री झाली आहे. मूग, उडीद, सोयाबीनचे अधिक बियाणे शिल्लक आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा ६ लाख ३९ हजार ४३० हेक्टरवर पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज होता. त्यानुसारच बियाण्यांची मागणी केली. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये ५१४८५ क्विंटल, २०२१ मध्ये ५३ हजार १३२ क्विंटल व २०२२ मध्ये ५० हजार ७७० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती.

तीन वर्षांच्या सरासरीनुसार यंदा ७० हजार ५७० क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती. त्यातील आतापर्यंत ५८ हजार ८०५ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. त्यातील आतापर्यंत ३२ हजार ७४९ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे.

उपलब्ध बियाण्यांतील ५५ टक्के बियाणे उपलब्ध विक्री झाल्याने ४५ टक्के बियाणे पडून आहे. शिल्लक बियाण्यांत सोयाबीन, बाजरी, मूग, उडदाचे अधिक बियाणे शिल्लक आहे.

खतांमध्ये या वर्षी ३ लाख ७ हजार ३८२ टन खतांची मागणी केली होती. त्यातील २ लाख १६ हजार ५०८ टन खते मंजूर होऊन ८६ हजार ७१५ टन खत प्राप्त झाले. ८१ हजार ६१७ टन खत मागील शिल्लक आहे.

मागील शिल्लक व सध्याचे उपलब्ध खत पाहता १ लाख ६८ हजार ३३२ टन खत उपलब्ध असताना आतापर्यंत केवळ २० हजार ६०९ टन खत विक्री झाले आहे. पुरेसा पाऊस नसल्याचा निविष्ठा बाजारावर परिणाम झाला आहे.

खत विक्री

(कंसात उपलब्ध खते (टनांत)

युरिया १६७९२ (५८८६९)

एमओपी ३८७ (४९६

एसएसपी ३२६ (२३६७४)

डीएपी १२८१ (१७६९३)

संयुक्त खते १८२३ (६७६००)

बियाणे विक्री क्विंटल (कंसात उपलब्धता (टनांत)

भात ३०८५ (३३३४)

बाजरी २०९५ (३६८७)

मका ३३४७ (७०२५)

तूर ६२१ (१३८४)

मूग ४६६ (१०६१)

उडीद ३४७८ (४५५१)

सोयाबीन १८३५४ (३५७७९)

कापूस १३०३ (१९८४)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी भवनांसाठी १३२ कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT