Dhananjay munde Agrowon
ताज्या बातम्या

Dhananjay munde : राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुंडे

Vasantrao Naik Memorial Day : स्व.वसंतराव नाईक साहेबांच्या 44 व्या पुण्यतिथी निमित्त वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठाण, पुसद यांच्या वतीने आयोजित कृषी गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

Team Agrowon

Yavatmal News : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ बारा वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळातील तीन दुष्काळांचे संकट त्यांनी संधी मानून संपूर्ण महाराष्ट्रात शेतीत क्रांती घडवून आणली. वसंतराव नाईक यांचे कार्य अजरामर आहे. राज्यात आजही कुठे अतिवृष्टी तर कुठे अवर्षण अशी स्थिती आहे. नाईक साहेबांचा आदर्श घेत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहील, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसदच्या वतीने शुक्रवारी (ता. १८) आयोजित वसंतराव नाईक यांच्या ४४ व्या स्मृतिदिन सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. कृषी क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे राज्यातील अकरा शेतकरी, महिला शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ, लेखक यांचा कृषिमंत्री मुंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री डॉ. एन. पी. हिराणी, आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक, माजी आमदार अनंत कुमार पाटील, माजी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार राजेंद्र नगरधने, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर, माजी नगराध्यक्ष अनिता नाईक, पुरस्कार निवड समिती प्रमुख ययाती नाईक, प्रा. गोविंद फुके, प्रतिष्ठानचे सचिव डॉ. उत्तम रुद्रवार, उपाध्यक्ष धनंजय सोनी, सदस्य सुरेश जाधव पाटील, नीळकंठ पाटील, क्रांती कामारकर, विजय जाधव, अनिरुद्ध पाटील, वसंत घुईखेडकर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रा. दिनकर गुल्हाने यांनी संपादित केलेली ‘ऋतुगंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन कृषिमंत्री यांच्या हस्ते झाले. या वेळी आपल्या शैलीदार वक्तृत्वातून वसंतराव नाईक यांच्या कार्याचा कृषिमंत्री मुंडे यांनी गौरव केला. महाराष्ट्र शासनाचे शेतीनिष्ठ, कृषिभूषण पुरस्कार २०२० पासून रखडले आहे. येत्या दोन महिन्यांत तीनही वर्षांचे पुरस्कार एका भव्य समारंभात कर्तबगार शेतकऱ्यांना प्रदान करण्यात येतील, अशी घोषणा मुंडे यांनी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर यांनी केले. आमदार इंद्रनील नाईक व नीलय नाईक यांनी शेतीप्रश्‍नविषयक मागण्यांचा ऊहापोह केला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. छाया कोकाटे आणि प्रा. संजय चव्हाण यांनी केले. प्रा. गोविंद फुके यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT