Grape Farmer Fraud
Grape Farmer Fraud Agrowon
ताज्या बातम्या

Grape Farmer Fraud : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची ४२ लाखांची फसवणूक

Team Agrowon

Sangli News : तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील १३ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची ४२ लाख ४७ हजार ८९० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली येथील नितीन बिरबल डोंगरे यांच्या विरोधात तासगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मळणगाव, अंजनी, डोंगरसोनी, सावळज, मणेराजुरी येथील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

या प्रकरणी तासगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मणेराजुरी येथील मनोज बाळासो जमदाडे यांच्या श्री स्वामी समर्थ कंपनीच्या माध्यमातून दिल्लीतील व्यापारी नितीन बिरबल डोंगरे (रा. मूळगाव वाडीत, जि. उस्मानाबाद, सध्या रा. अर्जुनगढ दिल्ली) याने १ जानेवारी ते २३ मार्च २०२३ दरम्यान त्याने मणेराजुरी, मळणगाव, अंजनी, सावळज, खुजगाव येथील शेतकऱ्यांचे द्राक्ष मालाचे पैसे थोडे थोडे पाठवीत होता.

त्यानंतर शेतकऱ्यांचे उर्वरित पैसे उधारी राखू लागला. त्याने मणेराजुरी, मळणगाव, अंजनी, सावळज, खुजगाव येथील शेतकऱ्यांची द्राक्ष मालाची रक्कम १) लक्ष्मण कांबळे, रा. सावळज ५,७३,०१५ रुपये, २) भगवान जमदाडे, रा. मणेराजुरी २,५९,७७७ रुपये,

३) विजय राजमाने, रा. मणेराजुरी ५०,००० रुपये, ४) सुमीत चव्हाण, रा. मळणगाव ५,५६,९३० रुपये, ५) धनाजी शिंदे, रा. मळणगाव २,०७,५४० रुपये, ६) विवेक लांडगे, रा. मणेराजुरी ९,९३,४४२ रुपये, ७) अनिल पाटील, रा. अंजनी २,३६,९९३ रु., ८)

केशव चव्हाण, रा. मणेराजुरी ४३,००० रु., ९) दिगू जमदाडे, रा. मणेराजुरी ५३,००० रु., १०) गणपती मलमे, रा. मळणगाव ५६,००० रुपये, ११) श्रीकांत शिंदे, मणेराजुरी १९,९६० रुपये, १२) सुभाष लांडगे, रा. मणेराजुरी ७,८१,०६५ रुपये, १३) तुषार कांबळे, रा. सावळज १२,००० रुपये, १४) बाळासाहेब पाटील, रा. खुजगाव १,२४,९२० रुपये व फिर्यादी मनोज जमदाडे यांची ३.०२,८०० रुपये,

अशी एकूण ४२ लाख ७०,८९० रकमेची फसवणूक केली असल्याची फिर्याद तासगाव पोलिसात मनोज जमदाडे यांनी दाखल केली आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसात नितीन डोंगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT