Food Processing  Agrowon
ताज्या बातम्या

Food Processing : प्रक्रिया उद्योगासाठी ३७९ कोटींचे अनुदान

Processing Industry : प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज मंजूर झाल्यानंतर या लाभार्थ्यांना ३७९ कोटी १४ लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : कृषी विभागामार्फत ‘आत्मनिर्भर पॅकेज’अंतर्गत पंतप्रधान भारत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून यंदा राज्यात १२ हजार ७८५ शेतकरी, तरुण उद्योजक, महिलांसह शेतकरी गट, कंपन्यांना प्रक्रिया उद्योगासाठी अनुदान देण्याचा लक्ष्यांक निश्‍चित केला आहे. प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज मंजूर झाल्यानंतर या लाभार्थ्यांना ३७९ कोटी १४ लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. गेल्या वर्षी या योजनेतून सात हजारांवर शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार तरुण, शेतकरी, महिला यांना प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभागाकडून पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये २०२०-२१ पासून राबविण्यात येत आहे.

कृषी उत्पादनाची वर्गवारी, प्रतवारी, साठवणूक करण्यासाठी जागा व इमारत आदींसाठी अनुदान दिले जाते. या योजनेतून लाभ मिळावा, यासाठी अर्जांचा ओघ सुरू आहे. गेल्या वर्षी मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून यंदा लक्ष्यांक वाढविल्याची स्थिती आहे.

यंदासाठी निश्‍चित लक्ष्यांक (कंसात अनुदान लक्ष्यांक)

मुंबई ः ३० (१ कोटी ३२ लाख), मुंबई उपनगर ः ४३ (१ कोटी ७५, लाख ) पालघर ः २५० (७ कोटी ५० लाख), रायगड ः ३१३ (९ कोटी ३७ लाख), रत्नागिरी ः ४३७ (१० कोटी), सिंधुदुर्ग ः २६३ (७ कोटी ८७ लाख),

ठाणे ः ३१३ (६ कोटी ८७ लाख), धुळे ः २५० (७ कोटी ५० लाख), जळगाव ः ५०० (१५ कोटी), नंदुरबार ः ३१३ (६ कोटी २५ लाख), नाशिक ः ५०० (१५ कोटी), नगर ः ५०० (१५ कोटी), पुणे ः ५०० (१५ कोटी), सोलापूर ः ४३७ (१३ कोटी १२ लाख),

कोल्हापूर ः ४३७ (१८ कोटी ५९ लाख), सांगली ः ५०० (१८ कोटी ५९ लाख), सातारा ः ४३७ (२१ कोटी २५ लाख), छत्रपती संभाजीनगर ः ६२५ (८ कोटी ७५ लाख), बीड ः २५० (८ कोटी ७५ लाख), जालना ः २५० (९ कोटी ३७ लाख), हिंगोली ः ३१३ (७ कोटी ५०), लातूर ः ३७५ (८ कोटी ७५ लाख), नांदेड ः ४३७ (१३ कोटी १२ लाख), धाराशिव ः ३१३ (९ कोटी ३७ लाख),

परभणी ः ३१३ (९ कोटी ३७ लाख), अकोला ः २६३ (७ कोटी ८७ लाख), अमरावती ः ४३७ (१२ कोटी ५० लाख), बुलडाणा ः ४३७ (१३ कोटी १२ लाख), वाशीम ः २५० (७ कोटी ५० लाख), यवतमाळ ः ४३६ (१२ कोटी ५० लाख), भंडारा ः २५० (७ कोटी ५० लाख), चंद्रपूर ः ४३७ (८ कोटी ७५ लाख), गडचिरोली ः ३१३ (६ कोटी २५ लाख), गोंदिया ः ३१३ (६ कोटी २५ लाख), नागपूर ः ४३७ (१३ कोटी १ लाख), वर्धा ः ३१३ (६, कोटी २५ लाख).

कृषी विभागाकडे करावेत अर्ज

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया (पीएमएफएमई) योजनेतून वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला ३५ टक्के व कमाल दहा लाख, वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना लाभ (इनक्युबेशन केंद्र, मूल्यसाखळी) ३५ टक्के व कमाल दहा कोटी, मार्केटिंग व ब्रॅडिंगमधील शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, स्वयंसाह्यता गट आणि त्यांचे फेडरेशन यांना प्रकल्पाच्या ५० टक्के अनुदान मिळत आहे. अनुदानासाठी कृषी विभागाकडे अर्ज करावा लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT