Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : वीजजोडणीची ३७५ शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा

Electricity : चार ते पाच वर्षांपासून डिमांड भरूनही शेतकऱ्यांना वीजजोडणी दिली जात नाही. परिणामी वीज वितरण कंपनीच्या धोरणामुळेच शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

Team Agrowon

Gadchiroli News : चार ते पाच वर्षांपासून डिमांड भरूनही शेतकऱ्यांना वीजजोडणी दिली जात नाही. परिणामी वीज वितरण कंपनीच्या धोरणामुळेच शेतकरी मेटाकुटीस आला आहे. आरमोरी उपविभागात अशा तब्बल ३७५ शेतकऱ्यांना वीजजोडणीची प्रतीक्षा लागून आहे.

पावसाने खंड दिलेल्या काळात पिकाच्या एका पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने शेतकऱ्याद्वारे वैयक्‍तिक सिंचन स्रोतावर भर दिला जातो. या स्रोतांमधून पाण्याचा उपसा करण्यासाठी त्यांना विजेची गरज राहते.

आरमोरी उपविभागात ३७५ शेतकऱ्यांनी त्यानुसार वीज जोडणीकरीता रीतसर पैशाचा भरणा केला. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांना वीजजोडणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. राज्यात वीजजोडणीचा अनुशेष असून सरकाद्वारे कृषिपंपांना वीज पुरवठ्यासाठी निधीची उपलब्धता केली जात नाही.

परिणामी हे काम रखडते आणि अनुशेष वाढतो, असा दावा कंपनीकडून केला जातो. मात्र या साऱ्या प्रकारात कोणतीही चूक नसलेला शेतकरी नाहक भरडला जात आहे. आरमोरी तालुक्‍याच्या आठ गावांतील शेतकऱ्यांकडे सिंचन व्यवस्था उपलब्ध आहे. तालुक्‍यातील व उपविभागातील ९७ गावे कोरडवाहू क्षेत्रात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी वैयक्‍तिक सिंचन स्रोत निर्माण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT