Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : पुणे विभागात ३४ टक्के रब्बीच्या पेरण्या

टीम ॲग्रोवन

पुणे ः थंडी पडण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना (Rabi Sowing) सुरुवात केली आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरीच्या ११ लाख ४९ हजार २६६ हेक्टरपैकी, तीन लाख ८७ हजार २३३ हेक्टर म्हणजेच सरासरी ३४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. थंडीत वाढ झाल्याने पेरणीच्या क्षेत्रात (Rabi Sowing Acreage) वाढ होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परतीच्या पावसाचा जोर १५ ऑक्टोबरच्या दरम्यान ओसरल्यानंतर रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात झाली. पुणे विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत ज्वारी, तीळ, जवस या पिकांच्या पेरण्या काही प्रमाणात झाल्या असून, त्याचे प्रमाण कमी आहे. गेल्या काही दिवसापासून थंडी वाढल्याने गहू, हरभरा या बियाण्यांच्या पेरण्या वेगाने सुरू आहेत.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात खरीप हंगामातील भात पिके काढणीच्या अवस्थेत आहे. बाजरी, मूग व उडीद पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. तूर, शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीन पिकांची काढणी पूर्ण झाली आहे.

भुईमुगाच्या शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. रब्बी हंगामातील ज्वारीची पिके वाढीच्या अवस्थेत असून, यंदा रब्बीतील ज्वारीची एक लाख ९५ हजार १८५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. इतर पिकांच्या पेरण्याही वेगाने सुरू आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील भात पीक काढणीच्या अवस्थेत आहे. बाजरी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. मका पीक काढणीच्या व कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

जिल्हानिहाय सरासरी क्षेत्र,

पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणीचे क्षेत्र टक्केवारी

नगर ४,५८,६३६ १,२१,५९५ २७

पुणे २,२९,७२२ ६५,७९७ २९

सोलापूर ४,६०,९१८ १,९९,८४१ ४३

एकूण ११,४९,२७६ ३,८७,२३३ ३४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT