Rabi Sowing : सांगलीत रब्बीचा १ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरा

सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला गती आली असली तरी करडई, सूर्यफूल या पिकांचा पेरा घटला आहे. तर गहू आणि हरभरा पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी नियोजन करत असून या पिकांच्या पेरणीला गती आली आहे.
Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon

सांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला (Rabi Sowing) गती आली असली तरी करडई, सूर्यफूल (Sunflower Sowing) या पिकांचा पेरा घटला आहे. तर गहू (wheat Sowing) आणि हरभरा पिकांच्या पेरणीसाठी (Chana Sowing) शेतकरी नियोजन करत असून या पिकांच्या पेरणीला गती आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजार ६६५ हेक्टरवर पेरा झाली आहे. पलूस तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे ९०८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यातील रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १ लाख ९० हजार ९६१ हेक्टर आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी नियोजन सुरू केले. ऑक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी पुढे आले. मूळात, जत तालुक्यात आगाप ज्वारीच्या पेरणीस प्रारंभ केला.

Rabi Sowing
Rabi Sowing : रब्बीची २ लाख ३५ हजार हेक्टरवर पेरणी

त्यानंतर आटपाडी, कवठे महांकाळ तालुक्यातील शेतकरी ज्वारीच्या पेरणीसाठी पुढे आले. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८७ हजार २१८ हेक्टरवर पेरा पूर्ण झाला होता. त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला गती आली. अर्थात या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ५० हजार ४७७ हेक्टर पेरणी उरकली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : एक लाख ६३ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी

जिल्ह्यातील जत तालुक्यात प्रामुख्याने करडईचे पीक घेतले जाते. परंतु यंदाच्या हंगामात अवघ्या ०.४ हेक्टरवर करडईचा पेरा झाला असून करडईच्या क्षेत्रात घट झाली आहे. तसेच सूर्यफूल पीक सर्वच तालुक्यांत शेतकरी घेतात. परंतु अद्याप सूर्यफूल पिकाच्या पेरणीसाठी शेतकरी पुढे आला नसल्याचे चित्र आहे.

जत तालुक्यात ५९ हेक्टरवर सूर्यफुलाचा पेरा झाला आहे. ज्वारीची पेरणी १ लाख १ हजार ६५ हेक्टर, गहू, ५०३० हेक्टर, हरभरा ८७२५ आणि मक्याची पेरणी १३३२९ हेक्टरवर पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसांत गहू आणि हरभरा या पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

तालुकानिहाय पेरणी झालेले

क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज १५८३८

जत ६८६६१

खानापूर १४८५

वाळवा २७६२

तासगाव ५३८५

शिराळा १७०४

आटपाडी १८११७

कवठे महांकाळ १७७६१

पलूस ९०८

कडेगाव ५१३३

एकूण १३७६६७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com