Crop Loan
Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : कृषी, संलग्न क्षेत्रासाठी ३ हजारांवर कोटींचे कर्जाचे उद्दिष्ट

Team Agrowon

Crop Loan in Parbhani : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) (NABARD) आगामी आर्थिक वर्षात (२०२३-२४) परभणी जिल्ह्याचा ४ हजार ८९२ कोटी रुपयाचे संभाव्य वार्षिक पतपुरवठा (Agriculture Credit Supply) आराखडा तयार केला आहे.

त्यानुसार कृषी कर्जासाठी एकूण ३ हजार ४११ रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट प्रस्तावित आहे. त्यात पीककर्जाचे २ हजार ५०० कोटी रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे. हा पतपुरवठा आराखडा प्रकाशित करण्यात आला आहे, अशी माहिती नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक एस. के. नवसारे यांनी दिली.

येत्या आर्थिक वर्षामध्ये परभणी जिल्ह्यात पीक उत्पादन, व्यवस्थापन, विपणन, कृषी मुदत कर्ज आणि संलग्न घटकांतर्गत ३ हजार कोटी रुपये एवढे उद्दिष्ट प्रस्तावित आले आहे. त्यात जल संसाधन विकासासाठी १०२ कोटी २५ लाख ७० हजार रुपये तर कृषी यांत्रिकीकरणांतर्गत १३५ कोटी ६८ लाख रुपये उद्दिष्ट आहे.

वृक्ष आणि फळबाग लागवडीसाठी ७१ कोटी ९६ लाख ६० हजार रुपये, वने आणि पडीक जमीन विकासासाठी १ कोटी १५ लाख ७४ हजार रुपये, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय अंतर्गत ८३ कोटी २५ लाख ५ हजार रुपये,कुक्कुटपालन व्यवसायासाठी ७० कोटी ६२ लाख ८ लाख रुपये, शेळी, मेंढी,वराह पालन व्यवसायासाठी २१ कोटी ९४ लाख ८१ हजार रुपये, मत्स्यपालन व्यवसायासाठी ३ कोटी ३० लाख १२ हजार रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

कृषी पायाभूत सुविधा अंतर्गत शेतमाल साठवणूक सुविधेसाठी वेअर हाऊस, गोदाम, मार्केट यार्ड, कोल्ड स्टोअरेज युनिट उभारणीसाठी ७५ कोटी ६५ लाख रुपये तर भूमी सुधार, मृदा संवर्धन,पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत २८ कोटी ९५ लाख हजार रुपये, अन्य कृषी पायाभूत सुविधा उभारणीसाठी ६ कोटी ४० रुपये उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अन्न व कृषी प्रक्रियेसाठी २७६ कोटी ६५ लाख ८० हजार रुपये, कृषिपूरक उपक्रमांसाठी २३ कोटी ४६ लाख २० हजार रुपये, सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग घटकांतर्गत १ हजार १०० कोटी रुपये कर्जाचे तसेच निर्यात, शिक्षण, गृह, नवीनीकरण ऊर्जा यासह इतर कर्जासाठी १०५ कोटी रुपये कर्जाचे उद्दिष्ट प्रस्तावित आहे.

वार्षिक पतपुरवठा आराखडा प्रस्तावित कर्जवाटप उद्दिष्ट (कोटी रुपये)

क्षेत्र - उद्दिष्ट

पीककर्ज - २५००.००

कृषी मुदत कर्ज - ५००.००

कृषी पायाभूत सुविधा - १११०.००

अन्न व कृषी प्रक्रिया, पूरक उपक्रम - ३००.००

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग - ११००.००

निर्यात पतपुरवठा - ४०.००

शैक्षणिक कर्ज - ५७.००

गृहकर्ज - १२८.००

नवीकरणीय ऊर्जा - ९.००

सामाजिक पायाभूत सुविधा - ४२.००

इतर कर्ज - १०५.००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT