Crop damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop damage : देवळ्यात ३० क्विंटल मका कणसे खाक

तालुक्यातील वाजगावमध्ये शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Team Agrowon

देवळा, जि. नाशिक : तालुक्यातील वाजगाव येथील संदीप रमेश देवरे यांच्या शेतावरील वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट (short circuit) होऊन लागलेल्या आगीत शेतातील ३० क्विंटल मका (Maize) कणसे, तसेच तीन ट्रॉली चारा खाक झाला. यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे ४२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

वाजगाव वडाळे रस्त्यालगत राहणारे शेतकरी संदीप देवरे यांनी त्यांच्या ३२ गुंठे क्षेत्रात (गट क्र.५६४) असलेल्या मका कापणीचा मक्ता गावातील मजुरांना दहा हजार रुपयांना दिला होता. मजुरांनी सोमवारी (ता. ३१) शेतातील मका कापणी केली होती. खुडलेली मक्याची कणसे शेतातच पडली होती.

या शेतावरून वीज कंपनीच्या वीजवाहक तारा गेलेल्या होत्या. बुधवारी (ता. २) सकाळी साडेनऊला लोडशेडिंगच्या वेळापत्रकानुसार वीज आली व लोंबकळणाऱ्या तारांवर बसलेले पक्षी उडाल्यामुळे तारांना हेलकावा बसून शॉर्टसर्किट झाले व ठिणग्या पडल्याने मक्याच्या चाऱ्याने पेट घेतला.

आग लागल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले; मात्र, शेतात पसरलेल्या सर्व चाऱ्यानेच पेट घेतल्यामुळे आग विझविणे अशक्य झाले. यामुळे सर्व चारा व मक्याची कणसे जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच सहायक अभियंता जितेंद्र देवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेताला भेट देऊन पाहणी केली. तसेच या घटनेबाबत वीज अभियंत्यांना कळविण्यात आले असल्याची माहिती श्री. देवरे यांनी दिली.

तलाठी कुलदीप नरवडे यांनी पीक नुकसानीचा पंचनामा केला आहे. संदीप देवरे यांनी वीज कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. लोंबकळणाऱ्या तारांमुळे दरवर्षी शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. वीज कंपनीने या सदोष तारांचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT