VAMNICOM Pune : सहकार मंत्रालयाने (Cooperative Ministry) वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटला (VAMNICOM) (व्हीएएनआयसीओएम) सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ३० कोटी रुपयांचे अनुदान (Subsidy) मंजूर केले आहे.
या निधीचा वापर विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थींसाठी नवीन वसतिगृह आणि उपहारगृह बांधणे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थींना सामंजस्य करारानुसार सहकारी प्रशिक्षण देणे, जागतिक दर्जाचे वसतिगृह, प्रशिक्षण कक्षाचे बांधकाम आणि व्यवस्थापनात लिफ्ट बसवणे यासाठी संस्थेच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
शिक्षणाची उभारणी करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असे सहकार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. १९६२ मध्ये स्थापित वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट हे सहकारी व्यवस्थापन प्रशिक्षण, संशोधन आणि सल्लामसलत यांचे प्रमुख केंद्र आहे, जे राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषदेच्या अंतर्गत कार्यरत आहे.
‘व्हीएएनआयसीओएम’ला केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने देखील प्रोत्साहन दिले आहे. आपल्या कार्यामध्ये, संस्था राज्य आणि राष्ट्रीय सहकारी महासंघाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी/सदस्य यांसारख्या राज्य आणि केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसाठी अनेक सहकारी प्रशिक्षण कार्यक्रमांची सुविधा देते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.