Water Conservation agrowon
ताज्या बातम्या

Water Conservation : लोकसहभागातून बांधले २८८ वनराई बंधारे

जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या समाधानकारक पावसामुळे उपलब्ध झालेल्या ओढे व नाल्यांमधील पाणी प्रवाहांना अडवण्यासाठी वनराई बंधारे उभारण्याची मोहीम कृषी विभागाने सुरू केली आहे.

Team Agrowon

जालना : जिल्ह्यात खरीप हंगामात. (Kharif Season) झालेल्या समाधानकारक पावसामुळे उपलब्ध झालेल्या ओढे व नाल्यांमधील पाणी प्रवाहांना अडवण्यासाठी वनराई बंधारे उभारण्याची मोहीम कृषी विभागाने सुरू केली आहे. आतापर्यंत श्रमदानातून २८८ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातही जिल्ह्यात बदनापूर तालुक्याने आघाडी घेतली आहे.

वनराई बंधारे बांधलेल्या भागांमधील जमिनीचा ओलावा टिकून राहण्यास तसेच जलसंधारणास मदत होणार आहे. जिल्ह्याची दुष्काळी भाग म्हणून ओळख पुसण्यास मदत होणार आहे, रब्बी हंगामासाठी पिकांना व पशुपक्ष्यांसाठी पाणीसाठे उपलब्ध होतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. कृषी सहायक व पर्यवेक्षकांनी शेतकऱ्यांना या उपक्रमांची माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी, आत्मातील शेतकरी गटांचे सदस्य, कृषी मित्र, उत्स्फूर्तपणे श्रमदानदेखील केले आहे.

आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण म्हणाल्या, की जिल्ह्यातील काही गावांमध्ये वनराई बंधाऱ्यांची वेगाने उभारणी सुरू आहे. हा बंधारा बांधण्यासाठी कोणताही निधी खर्च केला जात नाही. केवळ सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांची उपलब्धता ही मुख्य बाब आहे. रिकाम्या पिशव्यांमध्ये वाळू भरली जाते. पाणी वाहणाऱ्या नाल्याच्या योग्य ठिकाणी प्रवाहाला आडव्या रांगेत वाळूच्या गोण्या टाकल्या जातात. दोन गोण्यांमधील फटीत माती भरली जाते.

यातून कमी खर्च व कमी श्रमात चांगला बंधारा तयार होतो. हा बंधारा तात्पुरता असला तरी त्याचे लाभ लगेच पुढील हंगामासाठी होतात, असेही सौ . चव्हाण यांनी सांगितले. वनराई बंधारा बांधण्यासाठी जागा उपलब्ध असल्यास कृषी सहायक यांना कळवावे असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

तालुकानिहाय संख्या अशी...

जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या २८८ वनराई बंधारामध्ये जालना तालुक्यातील ४, जाफराबाद २९, बदनापूर ८७, भोकरदन २३,अंबड ३४, मंठा २१, परतूर २४ घनसावंगी २८ बंधाऱ्यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT