Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : नांदेड जिल्ह्यातील २६९ जनावरांचा ‘लम्पी स्कीन’मुळे मृत्यू

Team Agrowon

नांदेड : जिल्ह्यात लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराचा फैलाव अधिक प्रमाणात होत आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील २६९ गाय वर्ग जनावरांचा (Animal) या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडून मिळाली.

जिल्ह्यात मागील अनेक दिवसापासून गाय वर्ग जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकूण २२० बाधित गावात चार हजार ६६३ गाय वर्ग पशुधनाला लम्पी स्कीनची बाधा झाली आहे.

आतापर्यंत या आजाराने २६९ पशुधन मृत्यूमुखी पडले आहे. या आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या तीन हजार ९६ आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन एक ३०४ आहे. सद्यःस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. आजपर्यंत चार लाख २६ हजार ३१ प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे.

मृत पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या १४० वर पोचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT