रत्नागिरी : जिल्ह्यातील पौष्टिक गळिताची धान्य लागवड (Oil Seed Cultivation) कमी होत आहे. यामुळेच कोकणातील पडीक जमिनींचे (Barren Land) प्रमाण वाढत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामातील कडधान्य पिकांची (Pulses Crop) आणि भाजीपाल्याची लागवड (Vegetable Cultivation) थांबली असून गावोगावी ओलिताखलच्या जमिनी (Irrigated Agriculture Land) ओसाड पडण्याच्या प्रमाणात भर पडली आहे. सध्या जिल्ह्यात २१७३.१९ हेक्टर पडीक क्षेत्र आहे.
कोकणातली भातशेती आणि त्यानंतर खरीप हंगामात त्याच शेतजमिनीत अंगओलीतावर नाचणी, कडवा वाल, पावटा, कुळिथ, हरिक, तीळ, जवस, चवळी आदी पिकांची लागवड करतात. अनेक प्रकारच्या पोषणांनी युक्त अशी ही गळिताची धान्य रोजच्या आहारात सहज उपलब्ध असतात. त्यामुळे कोकणातील व्यक्तीचा आहार हा खऱ्या अर्थाने समतोल आणि योग्य पोषणांनी युक्त असतो.
त्यामुळेच रोगप्रतिकारशक्ती उत्तम असल्याने कोकणी माणूस सहसा संसर्गजन्य आजांराना बळी पडत नाही; मात्र आता परिस्थिती बदलत आहे. बहुतांश गावांमध्ये मजूर मिळत नाहीत, परवडत नाहीत, अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे जंगले कमी होत असून जंगलातील माकडे आता जवळच्या गावांमध्ये शिरू लागली आहेत.
भाजीपाल्याची लागवड झाली असेल तर माकडांकडून त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतीसाठी केलेली मेहनत वाया जाते. या कारणानेही अनेकांनी शेती करणे सोडून दिले आहे. पूर्वी ज्या घरांमधून मजूर उपलब्ध होत असत, त्या घरातील तरुण आता मुंबई, पुण्यासारख्या शहरात नोकरीसाठी स्थायिक झाले आहेत.
शहरातील लोकांचा गावांकडे कल वाढत आहे. यामुळेच गावातली लागती भातशेतीची जमीनसुद्धा बिगरशेती करून विकण्याच प्रमाण वाढत आहे. यामुळेच जमिनींचे भावही वधारत आहेत. सरकारच्या योजनामुळे गहू, तांदूळ, डाळ आता अगदी रास्त दरात रेशन धान्य दुकानांवर सहज मिळते. त्यामुळे पोटा-पाण्यासाठा शेती हा पर्यायही उरला नाही. इथल्या तरुणाला शेतीमध्ये मेहनत करण्यापेक्षा पारंपारिक जमीन विकून पैसे कमविणे सोप वाटते. अशा अनेक कारणांमुळे आता जिह्यातील शेतीचे प्रमाण कमी झाले आहे.
तालुका भातशेती क्षेत्र पडीक क्षेत्र
खेड १५२६.७४ ४३२.६३
गुहागर १७११.८७ २६३.६८
चिपळूण २३६२.३४ २८७.६
दापोली २६२९.३८ १५३.८
मंडणगड १४२८.८२ १२०.८३
रत्नागिरी ५२४७.५१ १६२.४९
राजापूर १९९४.५ ९१.२२
लांजा २४१९.३३ २६५.३८
संगमेश्वर ४१८९.८७ ३९३.९४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.