Junnar News : येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. ८) डाळिंबाच्या २० किलोच्या एका क्रेटला मिळाला ८ हजार रुपये भाव मिळाला. तर कांद्याला दहा किलोला २७१ रुपये दर मिळाल्याची माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, गाडगे सचिव रूपेश कवडे यांनी दिली.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजार समितीत कांद्याप्रमाणेच डाळिंबाचे लिलाव मोठ्या प्रमाणावर होत असतात. शुक्रवारी (ता. ८) जंबो डाळिंबास २० किलोच्या एका क्रेटला ८००० रुपये, तर एक नंबर डाळिंबास २० किलोला ५००० व दोन नंबर डाळिंबास २० किलोला ४००० रुपये बाजार भाव मिळाला.
तीन नंबर डाळिंबास २० किलोला ३००० रुपये दर मिळाला असून, मार्केटमध्ये ७३५ क्रेट विक्रीसाठी आले होते. तर कांद्याच्या २५ हजार २१० कांदा पिशवीची आवक झाली असून, एक नंबर कांद्यास दहा किलोला २७१ रुपये बाजारभाव मिळाला.
दरम्यान, येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. ८) आवक घटल्याने डाळिंबास चांगला बाजारभाव मिळाला असून, या ठिकाणी पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, शिरूर, नगर या ठिकाणांहून डाळिंब विक्रीसाठी येत असतात. कांद्याच्या बाजारात दहा किलोस २४५ ते २७१ रुपये बाजार भाव मिळाला होता.
तसेच एक नंबर कांद्यास २३० ते २५० बाजारभाव मिळाला. दोन नंबर कांद्यास २१० ते २४० रुपये बाजारभाव मिळला. तर तीन नंबर कांद्यास दहा किलोस १५० ते २०० रुपये बाजारभाव मिळाला. तर चिंगळी कांद्यास दहा किलोस ५० ते १५० रुपये बाजारभाव मिळाला. बदला कांद्यास दहा किलोस १५०ते २०० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.