Pomegranate Crop : पावसाअभावी डाळिंब बागाही सुकल्या

Kharif Crop : सद्यःस्थितीत भर पावसाळ्यात भयावह दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांसह डाळिंब बागा अडचणीत आल्या आहेत.
Pomegranate
PomegranateAgrowon

Nashik News : जिल्ह्यात बहुतांश भागांत पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतातील पिके करपू लागली; तर डाळिंब बागाही सुकू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सद्यःस्थितीत भर पावसाळ्यात भयावह दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांसह डाळिंब बागा अडचणीत आल्या आहेत. हजारो रुपये खर्चून पेरणी केलेल्या पिकांनी पावसाअभावी माना टाकल्याने शेतकऱ्यांवर नुकसान सोसण्याची वेळ आली आहे.

Pomegranate
Pomegranate Theft : सुकलवाडीतून दीड टन डाळिंबाची चोरी

कसमादे हे नाशिक जिल्ह्यातील डाळिंबाचे आगार मानले जाते. मात्र, पावसाच्या प्रतीक्षेत असलेले डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बागा जगविण्यासाठी मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. बहुतांश डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी भरमसाट खर्च करून लगडलेल्या डाळिंब बागांना टँकरद्वारे पाणी देऊन बागा जगविण्याची खटाटोप करीत आहेत.

Pomegranate
Pomegranate Farming : स्वकर्तृत्वातून राज्यातील ‘डाळिंब मास्टर’ ठरलेले पवार

यामुळेच फळबागेवरील केलेला खर्च यंदाच्या भयानक दुष्काळसदृश परिस्थितीत वाया जातो की, काय अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे पावसाच्या भिस्तवर शेतात बाजरी, मका, सोयाबीन तसेच कडधान्याची पेरणी केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीत मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्या शेतकऱ्यांनी शेतातील पिके वाचविण्यासाठी रात्रीचा दिवस करून धडपड करीत आहेत. यंदा भयंकर दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीपिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजन पूर्णता कोलमडून गेल्याने शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे.

आमच्या भागातील सुराणे, दुंधे व चिरखांड ही धरणे यावर्षी पूर्ण कोरडीठाक आहेत. पावसाअभावी फळबागा व पशुधन जगविणे कठीण होऊन बसले आहे.
- अशोक आहिरे, सरपंच, वायगाव
भर पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने पुढील निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे.
- दिनेश देसले, सरपंच, गोराणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com