Sugar Factory Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Factory : पुणे विभागात १८ साखर कारखाने सुरू

परतीच्या पावसामुळे उसात साचले पाणी; हंगाम सुरू होण्यास उशीर

Team Agrowon

पुणे ः गळीत हंगाम (Crushing Season) सुरू होऊन जवळपास २० दिवस होत आले आहेत. या कालावधीत साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बऱ्यापैकी सुरू होण्याची आवश्यकता होती. मात्र, परतीच्या पावसामुळे उसात पाणी साचल्याने हंगाम उशिराने सुरू झाला आहे. पुणे विभागात सहकारी आणि खासगी अशा एकूण ३१ साखर कारखान्यांपैकी १८ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे, अशी माहिती प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

चालू वर्षी १५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांनी गळीत हंगामास सुरूवात केली असली तरी हळूहळू साखर कारखाने सुरू होत आहेत. पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच दणका दिला. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात काही प्रमाणात अडचणी आल्या. अनेक ठिकाणी उसामध्ये पाणी साचल्याने ऊसतोड बंद ठेवावी लागली. त्यामुळे गळीत हंगाम धिम्या गतीने सुरू होता. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर हंगामास चांगली सुरूवात झाली. यंदा मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. मात्र, उसात जुलैपासून पाणी राहिल्याने उसाची फारशी वाढ झाली नाही. त्यामुळे उत्पादनात घट होत असल्याचे चित्र आहे.

पुणे विभागात सातारा, पुणे भागांत उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे उसाच्या तीन लाख हेक्टरपर्यंत लागवडी झाल्या. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे दोन लाख ७४ हजार १९६ हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे.शासनाने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. सध्या सुरू झालेल्या कारखान्यांमध्ये सहकारी ९ व खासगी ९ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख ७२ हजार ४०० टन एवढी

आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department Recruitment: बदल्यांचे ‘अर्थ’कारण

Online Fertilizer Booking Issue: ऑनलाईन खत बुकिंगविरोधात रास्ता रोको

Onion Procurement Delay: केंद्राच्या कांदा खरेदीचा बोजवारा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Agriculture Department Distributes Laptops: तेरा हजार कृषी अधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप

Rohit Pawar Hunger Strike: मंत्री महाजनांच्या आश्वासनानंतर रोहित पवारांचे आंदोलन स्थगित

SCROLL FOR NEXT