Exam Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture CET Exam : कृषी पदव्युत्तर ‘सीईटी’साठी १७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

Agriculture Education : कृषी व संलग्न विषयांच्या दहा विद्याशाखांसाठी यंदा होत असलेल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता (सीईटी-२०२३) १७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Team Agrowon

Pune News : कृषी व संलग्न विषयांच्या दहा विद्याशाखांसाठी यंदा होत असलेल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता (सीईटी-२०२३) १७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. येत्या २२ जुलैपासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अखत्यारित असलेल्या केंद्रांवर या परीक्षा सुरू होणार आहेत.

महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. अमोल देठे यांनी सांगितले, की महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या https://www.mcaer.org संकेतस्थळावर परीक्षागृह प्रवेशपत्रे (हॉलतिकिटे) विषयनिहाय उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

परीक्षार्थींनी ही प्रवेशपत्रे डाउनलोड करून घ्यावीत. विद्याशाखा दहा असल्या, तरी ९ विषयांसाठी परीक्षा होत आहेत. या परीक्षेतील गुणांचे ७० टक्के, तर आधीच्या पदवी परीक्षेतील ३० टक्के गुणांचे भारांकन विचारात घेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जाणार आहेत.

महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळामार्फत ही परीक्षा नियंत्रित केली जात असली, तरी मंडळाकडे स्वतःची यंत्रणा किंवा मनुष्यबळ नाही. त्यामुळे विद्यापीठांद्वारेच परीक्षा घेण्यापासून ते निकाल तयार करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते.

प्रवेश प्रक्रिया मात्र मंडळ किंवा विद्यापीठांकडून न होता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषेदेकडून नियंत्रित केली जाते. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्यभर यंदा १७ प्रमुख केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. परीक्षेकरिता एकूण १६ हजार ६३३ अर्ज आलेले आहेत. एकूण जागा मात्र साडेतेराशेच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

परीक्षार्थींनी संकेतस्थळावरील माहिती तसेच माहिती पुस्तिका पुन्हा एकदा सविस्तर वाचावी. त्यानंतरही परीक्षेसंदर्भात शंका किंवा समस्या असल्यास ०२० २५५२८११९ किंवा ०२० २५५२८५१९ या दूरध्वनी क्रमांकावर मार्गदर्शन मिळू शकणार आहे.

२२ जुलैला सकाळ सत्रात (१० ते १२ वाजेपर्यंत) उद्यानविद्या व अन्न तंत्रज्ञान आणि दुपार सत्रात कृषी अभियांत्रिकी व गृहविज्ञान विषयाची परीक्षा होईल. २३ जुलै रोजी सकाळी कृषी तर दुपार सत्रात वन तसेच मत्स्यविज्ञान आणि २४ जुलै राजी सकाळ सत्रात कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि दुपारी कृषी जैव तंत्रज्ञान विषयाची परीक्षा होईल.

निकाल ५ ऑगस्टला जाहीर होणार

कृषी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षा आटोपल्यानंतर उत्तरपत्रिका लगेचच एक ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. मात्र अधिकृत निकाल ५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Update: घाटमाथा, मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT