Agriculture Education : बारावीनंतर कृषी अभियांत्रिकीमधील संधी

Education Update : बारावीमध्ये विज्ञान, गणित विषय घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इतर शाखाप्रमाणेच कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखासुद्धा एक चांगला पर्याय आहे. प्रवेश घेण्यासाठी सीईटीचा स्कोअर धरला जातो.
Agriculture Education
Agriculture Education Agrowon
Published on
Updated on

डॉ. दिलीप पवार, डॉ. कैलास कांबळे

Indian Agriculture : बारावीमध्ये विज्ञान, गणित विषय घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इतर शाखाप्रमाणेच कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखासुद्धा एक चांगला पर्याय आहे. प्रवेश घेण्यासाठी सीईटीचा स्कोअर धरला जातो.

महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अशी चार कृषी विद्यापीठे आहेत.

या कृषी विद्यापीठांमध्ये कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालये आहेत. महाराष्ट्रात ५ सरकारी आणि १२ खासगी अशी एकूण १७ कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालये आहेत.

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेमध्ये कृषी यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी विभाग, सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, प्रक्षेत्र संरचना व अक्षय ऊर्जा अभियांत्रिकी विभाग आहेत. कृषी अभियांत्रिकी पदवीधारकास उच्च शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

Agriculture Education
Education : नक्षलप्रवण भागातील विद्यार्थ्यांना गावातच शिक्षण

कृषी अभियंत्यास मिळणाऱ्या संधी

१) ट्रॅक्टर कंपनी, शेती अवजारे कंपनी, बियाणे कंपनी, ठिबक व तुषार संच निर्मिती कंपनी, बँक, अन्न प्रक्रिया कंपनी, फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग, अन्नधान्य प्रक्रिया उद्योग, अन्नधान्ये, फळे आणि भाज्या निर्यात उद्योग, प्रक्रिया यंत्रसामग्री उद्योग, वन विभाग, वखार महामंडळ, मृद व जल संधारणाची कामे करणाऱ्या स्वयंसेवी संस्था इत्यादी.

२) स्पर्धा परीक्षा, रेल्वे, टपाल खाते, वनविभाग, अन्न व औषध प्रशासन, वखार महामंडळ, महाराष्ट्र लोक सेवा आयोग, केंद्रीय लोक सेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, विविध महामंडळे, कृषी विभाग, संयुक्त संरक्षण सेवा तसेच केंद्र शासनाच्या अंतर्गत एसआरएफ, जेआरएफ परीक्षा इत्यादी.

३) ट्रॅक्टर व विविध यंत्रांची डीलरशिप, ठिबक-तुषार सिंचन व पाइप डीलरशिप, डेअरी उद्योगातील डीलरशिप, शेडनेट, पॉली हाउस उभारणी व देखभाल उद्योग, ग्रीन हाउस उभारणी व देखभाल उद्योग, शेती अवजारे निर्मिती, अवजारे बॅंक,शीतगृह, गोदाम इत्यादी.

४) आधुनिक प्रकारचे गोठे उभारणी, पोल्ट्री शेड उभारणी, पशू पक्षी खाद्य निर्मिती.शेती कुंपणाची तार तयार करणे, सोलर कुंपण तयार करणे, सौर ऊर्जा साधनांची डीलरशिप, बायोगॅस उभारणी, अळिंबी उत्पादन आणि प्रक्रिया, गांडूळ खत निर्मिती, बायोचार निर्मिती, बायोमास ब्रिक्वेट उत्पादन, विविध स्रोतापासून इथेनॉल निर्मिती उद्योग.

५) यांत्रिकीकरण, शेतीमाल प्रक्रिया उद्योगासाठी प्रशिक्षण केंद्र उभारणी.

Agriculture Education
Agriculture Education Research : कृषी शिक्षण संशोधनातील पुनर्विलोकन समितीला मुदतवाढ

शिक्षण संधी

पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर एम.टेक. करण्यासाठी चारही कृषी विद्यापीठामध्ये सुविधा आहे. तसेच अनेक जण इतर राज्यातील कृषी विद्यापीठातही प्रवेश घेतात. तसेच GATE परीक्षा पास होऊन आय आय टी सारख्या नामवंत संस्थेमध्ये सुद्धा एम.टेक.साठी प्रवेश घेता येतो. तसेच TOEFEL, GRE सारख्या परीक्षा पास होऊन बाहेर देशात उच्च शिक्षणासाठी जाता येते.

माहिती तंत्रज्ञानातील संधी

१) इंटरनेट ऑफ थिंग्ज , ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामध्ये कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणायची क्षमता आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानामुळे पारंपरिक शेतीचे रूपांतर स्मार्ट शेतीमध्ये करणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानाचे अनेक प्रयोग कृषी उद्योगामध्ये सुरू आहे. हे नवीन तंत्रज्ञान हाताळण्याचे कौशल्य घेउन कृषी अभियंता भविष्यातील शेतीला मदतगार ठरणार आहे.

(डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com