Babasaheb Naik Yarn Mill Agrowon
ताज्या बातम्या

Cooperative Mill : बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे १७ कोटी वादात

Babasaheb Naik Yarn Mill : दि मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आला. परिणामी बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी संस्थेने फिक्‍स डिपॉजिट म्हणून ठेवलेली १७ कोटी रुपयांची रक्‍कम व त्यावरील व्याजाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

Team Agrowon

Yavatmal News : दि मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आला. परिणामी बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी संस्थेने फिक्‍स डिपॉजिट म्हणून ठेवलेली १७ कोटी रुपयांची रक्‍कम व त्यावरील व्याजाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

दि मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेचे या संदर्भातील आदेश सहकार आयुक्‍त अनिल कवडे यांनी गुरुवारी (ता. ६) निर्गमित केले आहेत.

हे आदेश यवतमाळ जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धडकताच एकच खळबळ उडाली. मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेत शेतकऱ्यांची संस्था असलेल्या बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी संस्थेची तब्बल १७ कोटी रुपयांची ठेव आहे. गेल्या काही वर्षातील व्याजही त्याला मिळणे अपेक्षित होते.

आता बॅंकेच्या व्यवहारावरच निर्बंध आल्याने या ठेवीचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महागाव तालुक्‍यातील पिंपळगाव येथे असलेल्या या सूतगिरणीच्या संचालकांनी शेतकरी हिताचा व्यापक विचार ठेवी ठेवताना केला नाही, असाही आरोप आहे.

मलकापूर बॅंकेच्या आर्थिकस्थितीचा विचार न करताच केवळ एक टक्‍का व्याजाच्या लोभापायी २२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

सुतगिरणीने राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून दीर्घ मुदतीत व खेळते भांडवल असे दोन्ही मिळून ४० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यांचा सहा कोटी रुपयांचा हप्ता भरणे बाकी आहे. संस्था आर्थिक अडचणीत वाटचाल करीत असताना अशा स्थितीत १७ कोटी रुपयांच्या हक्‍काच्या पैशाचा प्रश्‍न निर्माण होणे संचालकांच्या नियोजनशून्य कारभाराचा नमुना असल्याचेही चर्चिले जात आहे.

बॅंक अडचणीत आणण्यात बॅंकेचे संचालक मंडळच कारणीभूत आहे. परंतु राज्यात यशस्वी ठरलेल्या शेतकऱ्याच्या एका संस्थेचे या कारणामुळे मोठे नुकसान झाले आहे. ही सूतगिरणी राज्यात दुसऱ्या क्रमांकाची ठरली आहे. त्यामागे येथील अध्यक्ष, संचालकांची मेहनत आहे, असे असताना तत्कालीन अध्यक्षांच्या काळात अवघा एक टक्‍का अधिक व्याजासाठी मोठी रक्‍कम एका बॅंकेत गुंतवण्यात आली. आज त्या बॅंकेचा परवानाच रद्द झाला आहे.
- राजेश आसेगावकर, माजी अध्यक्ष, संचालक, बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी संस्था

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Free Utensils Scheme: बांधकाम कामगारांसाठी खास कल्याणकारी योजना; मिळणार मोफत गृहउपयोगी वस्तू

Plastic Flower Ban : कृत्रिम फुलांवर बंदीबाबत निर्णयाची अंमलबजावणी कधी?

Flood Crop Damage : पिकांसोबत मातीही गेली वाहून

Nimboli Ark: निंबोळी अर्क घरच्या घरी कसा तयार करायचा? निंबोळी अर्काचे फायदे काय ?

Agrowon Podcast: हळदीच्या दरावरील दबाव कायम, गवारला उठाव कायम, शेवगा महागले; काकडी आवक वाढली, लसूणचे भाव स्थिर

SCROLL FOR NEXT