माळेगाव, ता. बारामती ः ‘‘सहवीजनिर्मिती (Power Generation) आणि अल्कोहोल निर्मितीद्वारे (alcohol Production) अनुक्रमे दीड कोटी आणि ४० कोटींचे उत्पादन मिळविण्यात कारखान्याला प्रथमच एवढे मोठे यश मिळाले. भविष्यातदेखील कारखाना (Malegaon Sugar Factory) चांगली कामगिरी करून शेतकऱ्यांना चांगला दर देईल,’’ असा विश्वास माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी व्यक्त केला.
कारखान्याचा दसऱ्याला बुधवारी (ता. ५) आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ पार पडला. कारखान्याचे उपाध्यक्ष सागर जाधव व सौ. मीनल जाधव या दांपत्याच्या हस्ते व अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अग्निप्रदीपन समारंभ झाला.
या वेळी माळेगावने आगामी ऊस गळीत हंगामातही १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती संचालक मदनराव देवकाते यांनी दिली. त्या अनुषंगाने आवश्यक ती यंत्रसामग्रीची देखभाल दुरुस्तीची कामे पूर्णत्वाला आणली आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप, सुरेश देवकाते यांनी दिली.
या वेळी संचालक योगेश जगताप, मदनराव देवकाते, अनिल तावरे, बन्सीलाल आटोळे, तानाजी कोकरे, संजय काटे, सुरेश खलाटे, नितीन सातव, राजेंद्र ढवाण, रंजन तावरे, स्वप्नील जगताप, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, तानाजी देवकाते, मंगेश जगताप, प्रताप आटोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कारखाना प्रशासनाला मागील गळीत हंगामात तब्बल सात कोटी रुपये किमतीचा ३० हजार टन बगॅस वाचविण्यात करण्यास यश आले होते. त्या बगॅसचा ऑफ सीझनमध्ये डिस्टलरी व वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यासाठी उपयोग झाल्याचे सांगण्यात आले. ऐरवी माळेगावला तीन ते चार कोटी रुपयांचा बगॅस बाहेरील कारखान्यांकडून विकत घ्यावा लागत होता. परंतु यंदा पहिल्यांदाच ऑफ सीझनमध्ये पुरेसा बगॅस असल्यामुळे डिस्टिलरी १२५ दिवस कार्यरत राहिली आणि अल्कोहोलचे ८१ लाख अधिक लिटरचे उत्पादन मिळाले. त्याची अंदाजे किंमत सुमारे ४० कोटी रुपये इतकी होते.
‘केवळ गावे जोडण्याचा मुद्दा खटकतो’
‘‘मागील पाच वर्षांच्या तुलनेत अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या संचालक मंडळाने तीन वर्षांतच सभासदांना प्रतिटन ४४१ रुपये अधिकचे दिलेत. त्यामुळे माळेगाव कारखान्याचा कारभार उत्तमच आहे. फक्त गावे जोडण्याचा मुद्दा आम्हाला खटकतो. यापेक्षा वेगळा अर्थ अध्यक्ष व संचालक मंडळाच्या बाबतीत कोणी काढू नये,’’ अशी भावना सभासद रावसाहेब वनवे, श्री. शितोळे आदींनी व्यक्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.