Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : नुकसान भरपाईसाठी हवेत अकोला जिल्ह्याला १४२ कोटी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४२ कोटी ९६ लाख ८ हजार ८८४ रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

Team Agrowon

अकोला ः जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने (Heavy Rainfall) सर्वाधिक नुकसान केले आहे. याबाबत यंत्रणांनी नुकसानीचा संयुक्त अहवाल तयार केला असून सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर आणि अकोला तालुक्यात सर्वाधिक ६८३ गावातील ११ हजार ९ हजार ९९ शेतकऱ्यांचे नुकसान (Crop Damage) झाले. ९१ हजार ४०४ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४२ कोटी ९६ लाख ८ हजार ८८४ रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

जून आणि जुलै महिन्यांत जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने बाळापूर व अकोला तालुक्यांत शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले होते. नदी, नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने काही भागातील शेती खरडून गेल्याचा प्रकार घडला होता.२१ जुलैपर्यंत ३५५.१ मिली (५१.६ टक्के) पावसाची नोंद झाली. कपाशी, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद तसेच भाजीपाला व फळबागांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. ऑगस्ट महिन्यात सुद्धा जोरदार पाऊस झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. १२ ते २१ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आधीच पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घाससुद्धा पावसाने हिरावून नेला.

दरम्यान, या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आल्यानंतर आता संयुक्त संयुक्त पंचनाम्याचा अंतिम अहवाल तयार करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. पावसामुळे सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद व इतर जिरायती पिकांचे नुकसान झाले. त्यासोबतच पपई, केळी, लिंबू, संत्रा व इतर फळ पिकांचे अतिवृष्टीमुळे बाधित झाली.   ४२७ गावांतील पिकांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे ४२७ गावांतील १ लाख १० हजार १६३ शेतकऱ्यांचे ८३ हजार १३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी ११३ कोटी ६१ लाख ७०४ रुपयांच्या मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. ९२ गावांतील १ हजार २१४ शेतकऱ्यांचे ८२४ हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी २२ कोटी २५ लाख ६१ हजार रुपयांचा मदत निधीची आवश्यकता आहे. १६४ गावांतील ७ हजार ७२२ शेतकऱ्यांचे ७ हजार ४४७.२८ हेक्टरवरील फळ पिकाखालील बाधित क्षेत्राचे नुकसान झाले. त्यासाठी २६ कोटी ८१ लाख २ हजार ८० मदत निधीची मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : पीकविम्याची किरकोळ भरपाई देऊन शेतकऱ्यांची थट्टा करू नका; अधिकाऱ्यांना कृषिमंत्री चौहान यांचा इशारा

Chana Sowing: बीजप्रक्रियेनंतरच करा हरभरा पेरणी

Student Entrepreneurship: ‘कृषी’चे विद्यार्थी बनताहेत बेकरी उद्योजक

Parth Pawar : पार्थ पवारांनी १८०० कोटींची जमीन ३०० कोटींमध्ये हडपली; अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

Sugarcane Harvest: ऊस तोडणीचे शास्त्रीय नियोजन

SCROLL FOR NEXT