Elctricity Agrowon
ताज्या बातम्या

Elctricity : कृषिपंपांना १२ तास वीजपुरवठ्यातून जिल्ह्याला वगळल्याने नाराजीचा सूर

वाशीम येथील शेतकऱ्यांची दुजाभाव न करता पुरवठा करण्याची मागणी

Team Agrowon

मानोरा, जि. वाशीम : कृषिपंपांना (agricultural pumps) १२ तास वीजपुरवठा करण्याच्या निर्णयातून वाशीम जिल्ह्याला वगळल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. शासनाने वीजपुरवठ्यात दुजाभाव न करता जिल्ह्यात १२ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे. याबाबत शासनाला निवेदन पाठविले आहे.

पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत कृषिपंपांना १२ तास वीजपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. मात्र पश्‍चाम विदर्भातील जिल्ह्यांना हा निर्णय लागू करण्यात आला नाही. वाशीम जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखा जातो. शिवाय आंकाक्षित जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात विविध योजना अंमलात आणून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गत काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे.

परिणामी शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे. यंदादेखील खरिपातील झालेल्या वेळोवेळच्या अतिवृष्टीमुळे पीक उत्पादन घटले आहे. कृषिपंपांना नियमित वीज मिळत नाही. या भागांत १२ हजारांपेक्षा अधिक हेक्टरवर पेरणी रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. हरभरा, गहू पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. वीजपुरवठ्याच्या व्यत्ययामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. अनियमित वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या कृषिपंपांना आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. तोही अनियमित होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्याप्रमाणे तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी मानोरा तालुका शेतकरी कृती समितीने निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.

पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत शेतीसाठी बारा तास वीजपुरवठा करण्यास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये वाशीम जिल्ह्याला वगळणे हा शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक निर्णय आहे. याबाबत शासनाला निवेदन पाठविण्यात आले आहे. त्याची दखल तातडीने घ्यावी.

- डॉ. संजय रोठे, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT