Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’कडे दुर्लक्ष बुलडाणा जिल्ह्याला भोवले

राज्यात सर्वाधिक जनावरे दगावली; यंत्रणा तोकडी
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon
Published on
Updated on

अॅग्रो स्पेशल
बुलडाणा ः जिल्ह्यात लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजारामुळे राज्यात सर्वाधिक जनावरे दगावल्याचा दुर्दैवी विक्रम नोंदवल्या गेला आहे. प्रशासनाचे याकडे झालेले दुर्लक्ष हे यामागे प्रमुख कारण असून तोकडी यंत्रणा, पुरेशा औषधोपचाराचा अभाव अशी कारणेही यामागे आहेत. जिल्ह्यात खामगाव तालुक्यात आजवर सर्वाधिक सव्वा सहाशेपेक्षा जास्त जनावरे या आजाराने बळी पडले आहेत. यात प्रामुख्याने दुधाळ गायींची संख्याच १७०० वर आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनग्रस्त जनावरांकडे नको दुर्लक्ष...

साधारणतः चार महिन्यांपूर्वी शेजारच्या अकोला जिल्ह्यात या आजाराच्या प्रादुर्भावाचे केंद्र निश्चित झाले होते. यानंतर पशुसंवर्धन यंत्रणा जागी झाली. खात्याचे मंत्री, आयुक्त तेथे भेट देऊन गेले. दुसरीकडे शेजारीच असलेल्या या जिल्ह्यात मात्र ‘लम्पी स्कीन’ला तितके गांभिर्याने घेतले जात नव्हते.
दररोज बाधित जनावरांची संख्या वाढत असताना नियमित आजार म्हणून त्याकडे पशुसंवर्धन खात्याने पाहिले. बहुतांश पशुवैद्यकीय दवाखाने प्रभारींच्या खांद्यावर सुरू असल्याने वेळेवर औषधोपचार मिळण्यात अडचणी आल्या. यातून प्रादुर्भाव वाढत होता आणि महागमोलाची जनावरे दगावत होती.

Lumpy Skin
Lumpy skin : ‘लम्पी’च्या लढाईत बैलांकडे दुर्लक्ष नको

प्रशासनाच्या नोंदीनुसार बुलडाणा जिल्ह्यात ३२९ गावे ‘लम्पी स्कीन’ प्रादुर्भाव ठिकाणे ठरली. या गाव परिसरात सुमारे एक लाख ४६ हजार जनावरे आहेत. त्यात सुमारे ४०९१० जनावरे बाधित झाली होती. जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढल्यानंतर लसीकरणाला वेग देण्यात आला. सुमारे ३ लाख ४४ हजार जनावरांचे लसीकरण केल्याचा दावा होत आहे. यामुळे ३२८०० जनावरे दुरुस्तसुद्धा झाली. तरीसुद्धा सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा उद्रेक होऊन १२ नोव्हेंबरपर्यंत ३८९६ जनावरांचा बळी घेतला. आजही चार हजारांवर जनावरे बाधित आहे. त्यात साडेतीनशेपेक्षा अधिक गंभीर स्वरुपाची आहेत. लसीकरण होऊनही काही जनावरांना तितकासा फायदा झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात दिवसाला ‘लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भावामुळे ३० ते ३५ जनावरे दगावतच आहेत, ही चिंताजनक बाब आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : लम्पी स्कीन’ प्रादुर्भावामुळे नाशिकमध्ये ६२ जनावरे मृत

चौकट ----
घाटाखालील तालुक्यात अधिक प्रभाव
‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव जिल्ह्यात घाटाखालील तालुक्यांमध्ये सर्वाधिक होता. जळगाव जामोद, खामगाव, नांदुरा, संग्रामपूर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नोंदवल्या गेला आहे. खामगाव तालुक्यात तर सर्वाधिक ६२८ जनावरे दगावली. एवढ्या संख्येने अनेक जिल्ह्यांत सुद्धा जनावरे दगावलेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. खामगावमध्ये ४६०० जनावरे बाधित झाली होती. त्यापैकी ६०० दगावली. जळगाव जामोदमध्ये ६२४२ जनावरे बाधित झाली. त्यापैकी ५६३ दगावली. हा तालुका जनावरांच्या मृत्यूत दुसऱ्या स्थानावर आहे. मलकापूर तालुक्यात ४४८० जनावरे बाधित झाली होती. त्यापैकी ४६८ दगावली. नांदुऱ्यात ४२६६ बाधित होऊन ४४८ दगावली तर संग्रामपूरमध्ये ४१०० जनावरे बाधित झाल्यानंतर ४९० जनावरे दगावलेली आहेत. घाटाखालील तालुक्यात हा प्रादुर्भाव सर्वाधिक राहण्याची कारणे शोधण्याची आवश्यकता आहे.

तालुकानिहाय दगावलेली जनावरे
खामगाव ६२८
जळगाव जामोद ५६३
मलकापूर ४६८
संग्रामपूर ४९०
नांदुरा ४४८
शेगाव ३२७
देऊळगावराजा ५०
मोताळा ४०५
सिंदखेडराजा ४२
लोणार ३७
चिखली १८८
मेहकर १४३
एकूण ३८९६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com