Pune Dam Agrowon
ताज्या बातम्या

Pune Dam Water : पुण्यातील १२ धरणे शंभर टक्के भरली

Team Agrowon

Pune Rain Update : गेल्या तीन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे ओढे-नाल्यांच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २६ पैकी १२ धरणे शंभर टक्के भरली आहेत.

त्यामुळे आगामी काळातील शेतकऱ्यांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. वरसगाव, पानशेत, पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडीवळे, डिंभे, भाटघर, निरा देवघर ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

पुणे जिल्ह्यात बुधवारपासून (ता. २०) पावसास चांगली सुरुवात झाली. अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. सोमवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३६ मिलिमीटर पाऊस पडला. घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २७ मिमी पाऊस पडला.

ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, कुंडली या घाटमाथ्यावर पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तर टेमघर, पानशेत, खडकवासला, कळमोडी, चासकमान, आंध्रा, नाझरे, गुंजवणी, निरा देवघर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, विसापूर या धरणक्षेत्रात तुरळक सरी पडल्या.

जिल्ह्यातील सर्व धरणांत मिळून मागील चोवीस तासांमध्ये एकूण २.४५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्याअगोदर रविवारी (ता. २४) चोवीस तासांमध्ये २.३३ टीएमसी, शनिवारी २.०७ टीएमसी, गुरुवारी १.६० टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली होती. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढण्यास मदत झाल्याने ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.

जिल्ह्यातील सर्व धरणांची मिळून पाणीसाठवण क्षमता एकूण १९८.३४ टीएमसी आहे. आतापर्यंत १४२.१२ टीएमसी म्हणजेच ७१ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात या धरणात २००.४५ टीएमसी म्हणजेच १०१ टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी झाला असला तरी पावसाचे प्रमाणही कमी राहिले असल्याचे चित्र आहे.

मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या चारही धरणांत पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ०.३४ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक मागील चोवीस तासांमध्ये झाली आहे. निरा खोऱ्यातील धरणक्षेत्रातही पाऊस कमीच होता.

त्यामुळे पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडीवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, निरा देवघर, वीर या धरणांत एकूण ०.५२ टीएमसी एवढेच पाणी दाखल झाले. कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड धरणांतही कमीअधिक पाऊस होता. त्यामुळे धरणांत नव्याने ०.६३ टीएमसी एवढेच पाणी आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT