Desi Liquor  Agrowon
ताज्या बातम्या

Desi Liquor : हातभट्ट्यांवरील ११ हजार लिटर गूळमिश्रित रसायन नष्ट

State Excise department : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी (ता. १२) जिल्ह्यातील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या तांड्यांवर छापे टाकले.

Team Agrowon

Solapur News : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी (ता. १२) जिल्ह्यातील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या तांड्यांवर छापे टाकले. ११ गुन्ह्यांमध्ये १३० लिटर हातभट्टीसह १० हजार ९९० लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करून जागीच नष्ट केले.

संपूर्ण राज्यभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘हातभट्टीमुक्त गाव’ अभियानाचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर विभागाने शनिवारी जिल्हाभर विशेष मोहीम राबविली.

या मोहिमेअंतर्गत सोलापूर विभागाचे अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील घोडा तांडा, कवठे तांडा, भोजप्पा तांडा व शिवाजीनगर तांडा या ठिकाणी सकाळच्या सुमारास धाडी टाकल्या.

या धाडीत एकूण आठ गुन्ह्यात १०० लिटर हातभट्टी दारू व नऊ ६०० लिटर रसायन, असा एकूण दोन लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई निरीक्षक सदानंद मस्करे, राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक अक्षय भरते, उषाकिरण मिसाळ, मानसी वाघ, सुरेश झगडे, कृष्णा सुळे, मयुरा खेत्री, राजेंद्र वाकडे, सचिन गुठे, मुकेश चव्हाणयांच्या पथकाने केली.‌

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगासाठी १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये

Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?

Cyber Security: सायबर सिक्युरिटीवरून जिल्हा बँक सभेत गोंधळ

Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT