Agriculture Inputs : लोकसहभागातून उभारले पारंपरिक कृषी निविष्ठा निर्मिती केंद्र

Organic Farming : सेंद्रिय निविष्ठांवर खर्च कमी होत असला तरी त्यापासून उत्पादनाची हमी नसल्याचा शेतकऱ्यांचा समज आहे. तो समज कशाप्रकारे दूर करावा याकडे लक्ष दिले पाहिजे.
Agriculture Inputs
Agriculture Inputs Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आणि वाशीम कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे(आत्मा) अंतर्गत नेतंसा गावात योगऋषी जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकारात महाराष्ट्रातील पहिले परंपरागत कृषी निविष्ठा निर्मिती केंद्र (माती) लोकसहभागातून उभारण्यात आले आहे.

या माती केंद्राचे उद्‌घाटन आमदार अमित झनक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य धनिराम बाजड होते. प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, सर्ग विकास समितीचे शरद सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.

Agriculture Inputs
Agriculture Inputs : ‘केव्हीके’कडील निविष्ठा खरेदीला बंदी

आमदार झनक म्हणाले, सेंद्रिय निविष्ठांवर खर्च कमी होत असला तरी त्यापासून उत्पादनाची हमी नसल्याचा शेतकऱ्यांचा समज आहे. तो समज कशाप्रकारे दूर करावा याकडे लक्ष दिले पाहिजे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून तो दूर व्हावा असे वाटते.

संघटनेत शक्ती असून शेतकऱ्यांनी परंपरागत कृषी निविष्ठा एकत्र तयार करावी जेणेकरून महागड्या औषधी कंपन्यांवर आळा बसेल. आपल्या शेतकऱ्यांना दर्जेदार किफायतशीर निविष्ठा उपलब्ध होतील. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.

Agriculture Inputs
Agriculture Inputs : निविष्ठा खरेदीसाठी कुलगुरूंचे कृषी आयुक्तालयाला पत्र

श्री. शाह म्हणाले, या निविष्ठा केंद्रातून विविध कृषी निविष्ठा निर्मितीबरोबरच रोजगार सुद्धा उपलब्ध होणार आहे. या परंपरागत कृषी निविष्ठा निर्मिती केंद्रामध्ये शेतकऱ्यांना लागणाऱ्या कीड रोग संरक्षक तसेच वृद्धीवर्धके नैसर्गिक तथा सेंद्रिय पद्धतीने जवळपास विविध प्रकारच्या ४० निविष्ठा तयार करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अनिसा महाबळे म्हणाल्या, पिकाला प्रत्येक अवस्थेमध्ये विविध अन्न घटकांची आवश्यकता असते. कीडरोगांचे व अन्नद्रव्याचे एकात्मिक व्यवस्थापन गरजेचे असते.

या ठिकाणी शेतकऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून विविध सेंद्रिय निविष्ठा तसेच बायोडायनिक पद्धतीने निविष्ठा तयार करण्याच्या पद्धतीविषयी श्री. शाह यांनी मार्गदर्शन केले. जैविक शेती मिशनमध्ये काम करणाऱ्या जिल्ह्यातील पाचही शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी सहभागी होते.

शंकर शिंदे, मास्टर ट्रेनर संजय मांडवगडे, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, संदीप मोरे, कृषी पर्यवेक्षक आर. एस. जाधव, कृषी सहायक गिरी, योगऋषी शेतकरी उत्पादक कंपनीचे दामोदर गोळे, संदीप बाजड, सचिन बाजड, संदीप बाजड, शंकर बजाड आदींनी पुढाकार घेतला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com