Farmer Loan Waiver agrowon
ताज्या बातम्या

Farmer Loan Waiver : नियमित कर्ज परतफेड केली ती चूक झाली का? सत्तानाट्यात शेतकरी वाऱ्यावर

sandeep Shirguppe

Farmers Incentive Grant : राज्यात २०१९ साली महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर तत्त्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. यामध्ये कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार होते.

दरम्यान मागच्या एक वर्षात काही अंशी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झाले. मात्र, दोन टप्प्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले परंतु यानंतरच्या याद्या जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांना कोण वाली नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मागच्या ४ वर्षात राजकारणात झालेल्या खिचडीमुळे कर्जमाफीची घोषणा हवेतच राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ११ हजार पात्र शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी पाठपुरावा करण्यासाठी विकास संस्था, बँक, सहकार विभागाकडे चौकशी केली.

परंतु सरकारकडून हा पैसा बँकेत जमा झालाच नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी नियमित परतफेड करून खरोखरच चूक केली का? अशी तीव्र भावना व्यक्त केली.

कोल्हापूर जिल्हा हा राज्यात नियमित परतफेड करण्यात अग्रेसर आहे. मिळालेल्या माहितीनुसार शंभराहून अधिक विकास संस्थाची वर्ष अखेरीस १०० टक्के कर्जवसुली होते. त्यामुळे येथे कर्जमाफीपेक्षा प्रोत्साहन अनुदानाचा लाभ जास्त शेतकऱ्यांना होतो.

त्यामुळेच जिल्ह्यातील ३ लाख ९४४ शेतकऱ्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील १ लाख ८९ हजार ३६८ शेतकरी पात्र ठरले. या शेतकऱ्यांना ‘केवायसी’ पूर्तता करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार १ लाख ८७ हजार ६१६ शेतकऱ्यांनी त्याची पूर्तता केली. केवायसी पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र, टप्प्याटप्प्याने ते संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जात आहेत.

आतापर्यंत १ लाख ७६ हजार ६०० शेतकऱ्यांना ६४२ कोटी ३५ लाख रुपये मिळाले. अद्याप ११ हजार १६ पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. परंतु या शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार हाच प्रश्न पडला आहे.

दरम्यान महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आवाज उठवत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा करणार असा सवाल उपस्थित केला होता. परंतु अजित पवारच आता सत्तेत सामील झाल्याने ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देतात का याकडे पाहणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT