Lumpy Skin  Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : लम्पी स्कीन आजाराचे १ हजार ३५२ सक्रिय पशुरुग्ण

Lumpy Skin Parbhani : परभणी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराच्या सक्रिय पशुरुग्णांच्या संख्येत मागील पंधरा दिवसात ६७८ ने वाढ झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराच्या सक्रिय पशुरुग्णांच्या संख्येत मागील पंधरा दिवसात ६७८ ने वाढ झाली आहे. गुरुवार (ता. २४) पर्यंत या दोन जिल्ह्यांतील लम्पी स्कीन आजाराचे १ हजार ३५१ पशुरुग्ण होते.

यंदा एप्रिलपासून आजवर या दोन जिल्ह्यांतील ३ हजार ४५३ जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला. उपचारानंतर १ हजार ६२२ जनावरे बरी झाली आहेत. परंतु गंभीर असलेली ४८० जनावरे दगावली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात बुधवारी (ता. ९) लम्पी स्कीन आजाराचे ३७३ सक्रिय पशुरुग्ण होते. मागील पंधरा दिवसांत त्यात ५१९ पशुरुग्णांची भर पडून गुरुवारी (ता. २४) एकूण ८९२ सक्रिय पशुरुग्ण होते. त्यापैकी ३६ पशुरुग्ण गंभीर आहेत. जिल्ह्यात गायी, बैल, म्हैस मिळून एकूण ३ लाख ९८ हजार ३५६ पशुधन होते. यंदा १ एप्रिलपासून आजवर लम्पी स्कीन आजारामुळे १ हजार ८६४ जनावरांमुळे बाधित झाली आहेत.

त्यात ८४५ गायी, १ हजार १९ बैलांचा समावेश आहे. उपचारानंतर ५९८ जनावरे बरी झाली आहेत त्यात २५४ गायी व ३४४ बैलांचा समावेश आहे. यंदा आजवर ३७४ जनावरे दगावली आहेत. त्यात ४८ गायी, ९२ बैल, २३४ वासरे आहेत.आजवर २ लाख ६५ हजार २५४ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुधनास लसीची दुसरी मात्रा दिली जात आहे.

वासरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव अधिक होत आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती केली जात आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्या यंदा १ एप्रिलपासून २३५ गावांतील १ हजार ५८९ जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.

सध्या ४५९ सक्रिय पशुरुग्ण आहेत. उपचारानंतर एकूण १ हजार २४ जनावरे बरी झाली आहेत. आजवर १०६ जनावरे दगावली आहेत. यंदा २ लाख ३२ हजार २०० लसमात्रा प्राप्त झाल्या. एकूण २ लाख २६ हजार २४२ जनावरांचे लसीकरण करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT