Fertilizer  Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Stock : खरिपासाठी यंदा सोलापूरला १ लाख ४२ हजार टन खत

Kharif Season 2023 : सोलापूर जिल्ह्याचा मुख्य हंगाम रब्बी आहे. पण गेल्या पाच-सहा वर्षापासून जिल्ह्यात खरीपातही मोठ्याप्रमाणात पिके होत असल्याने खरीपातही पेरणी वाढत आहे

Team Agrowon

Solapur News : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी यंदा विविध प्रकारच्या ग्रेडचा एक लाख ४२ हजार ६०२ मेट्रिक टन खताचा साठा मंजूर झाला आहे, तसेच जिल्ह्यातील विक्रेत्यांपर्यंतही तो पोच झाला आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्याचा मुख्य हंगाम रब्बी आहे. पण गेल्या पाच-सहा वर्षापासून जिल्ह्यात खरीपातही मोठ्याप्रमाणात पिके होत असल्याने खरीपातही पेरणी वाढत आहे.

या हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, मटकी, सूर्यफूल, मका ही पिके घेतली जातात. त्यातही तूर आणि सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक होते.

या पिकासाठी प्रामुख्याने युरिया आणि डीएपीला सर्वाधिक मागणी राहते. त्यामुळे त्याचा पुरेसा साठा उपलब्ध कऱण्यात आला आहे. अर्थात, या हंगामाचे सगळे गणित पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत.

सोलापूर जिल्ह्याचे खरिपाचे उद्दिष्ट यंदा ३ लाख ५९ हजार ५०० हेक्टर इतके घेण्यात आले आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र ३ लाख ५९ हजार ९४ हेक्टर इतके होते. तसेच यंदा तूर आणि उडदाच्या पिकाखालील क्षेत्रवाढ कृषी विभागाने अपेक्षित ठेवली आहे.

युरियासह डीएपीही पुरेसा

यंदाच्या हंगामासाठी युरिया ४३ हजार २०४ मेट्रिक टन, डीएपी १५ हजार २३३ टन, एनपीके ६० हजार ५४ टन, एमओपी ११८३ टन, एसएसपी- २२ हजार ९२७ टन असा एकूण १ लाख ४२ हजार ६०२ टनाचा खतसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक युरिया आणि डीएपीला मागणी असते, पण मागणीच्या प्रमाणात तो पुरेसा आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT