Fertilizer Market : शेतकऱ्यांवर खतांच्या वाहतूक खर्चाचा भार

Fertilizer Transport : यावर्षीही चांदूरबाजार येथील रॅक उपलब्ध होणार नसल्याने खताचे वितरण बडनेरा व धामणगावरेल्वे येथीलच रॅक पॉइंटवरून करावे लागणार आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

Amravati News : यावर्षीही चांदूरबाजार येथील रॅक उपलब्ध होणार नसल्याने खताचे वितरण बडनेरा व धामणगावरेल्वे येथीलच रॅक पॉइंटवरून करावे लागणार आहे. खतांच्या किमतीत वाढ झाली नसली तरी विक्रेते वाहतूक खर्च शेतकऱ्यांकडून वसूल करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘एमआरपी’पेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

जिल्ह्यात ४५ ते ४७ हजार टन साठा सध्या उपलब्ध असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत खत वितरणासाठी बडनेरा व धामणगावरेल्वे येथे रॅक पॉइंट आहेत. चांदूरबाजार येथे नवीन रॅक पॉइंट तयार करण्याचे प्रस्तावित होते. मात्र रेल्वे विभागाकडून गोदाम उभारण्यात आले नसल्याने रॅक तयार होऊ शकलेली नाही.

Fertilizer
Organic fertilizer : जमिनीच्या सुपीकता, उत्पादकतेसाठी सेंद्रिय खतांची आवश्यकता

कृषी अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या ‘डीआरएम’सोबत त्यासाठी संपर्क केल्यानंतरही हंगाम तोंडावर आला असताना तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे यावर्षी या रॅक पॉइंटहून वितरणाची शक्यता मावळली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या रॅकसाठी जिल्हा नियोजनमधून निधी घेण्याची मुभा दिली आहे. मात्र हा पैसा रेल्वेविभागाकडे वर्ग करावा लागणार आहे. रेल्वेविभाग मात्र त्यासाठी उदासीन आहे.

Fertilizer
Chemical Fertilizer : परभणी-हिंगोलीत एक लाख टनावर रासायनिक खते शिल्लक

दरम्यान, बडनेरा व धामणगावरेल्वे येथून वितरणासाठी विक्रेते वाहतूक खर्च शेतकऱ्यांकडून वसूल करीत आहे. त्यांना एमआरपीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. परिणामी, अशा प्रकरणात कारवाईसाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

१ लाख १४ हजार मेट्रिक टन खतांचे आवंटन

जिल्हा कृषी कार्यालयाकडून दरवर्षी संभाव्य मागणी लक्षात घेऊन नियोजन करण्यात येते. वर्ष २०२२ मध्ये १ लाख १० हजार ९३ मेट्रिक टन खतांचा वापर केला गेला, तर वर्ष २०२३ साठी १ लाख ६० हजार मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली.

त्यापैकी १ लाख १४ हजार ३१० मेट्रिक टन कोटा मंजूर करण्यात आला. ३१ मार्च २०२३ अखेर रब्बी हंगाम २०२२-२३ मधील ३३ हजार ११० मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. २० एप्रिलपर्यंत ११,९३७ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्याचा खतांचा कोटा निश्चित झाला आहे. उपलब्ध साठ्यानुसार मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येतो. यंदा खतांची टंचाई नाही. शेतकऱ्यांनी एमआरपीनुसार खरेदी करावी. जिल्ह्यात १ लाख १४ हजार ३१० मेट्रिक टन खतांचा कोटा मंजूर होईल.
- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com