Sugarcane Management : उसातील खोडवा, पाचट व्यवस्थापनावर कार्यशाळा

‘केव्हीके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाइन कार्यशाळा झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूरचे मृदा शास्त्रज्ञ डी. बी. भानवसे होते.
Sugarcane Management
Sugarcane Managementagrowon

सोलापूर ः कृषी विज्ञान केंद्राच्या (Krushi Vidnyan Kendra) वतीने ऊस पिकातील खोडवा आणि पाचट व्यवस्थापनासाठी (Sugarcane Management) जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून ‘केव्हीके’तर्फे नुकतीच ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली.

Sugarcane Management
Sugarcane Cultivation : एक लाख १८ हजार हेक्टरवर ऊस लागवडी

‘केव्हीके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाइन कार्यशाळा झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूरचे मृदा शास्त्रज्ञ डी. बी. भानवसे होते. या कार्यशाळेत अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा तालुकयातील शेतकऱ्‍यांनी सहभाग नोंदविला.

Sugarcane Management
Sugarcane FRP : सांगलीत दुसऱ्या दिवशीही ऊसतोड बंद

डॉ. भानवसे यांनी ऊस पिकामध्ये सूक्ष्मजीवाणूंची वाढ करावयाची असेल, तर पाचट व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. त्याद्वारे सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढून त्याव्दारे उसाची उत्पादकता व जमिनीचे आरोग्य वाढण्यास मदत होईल, असे सांगितले.

डॉ. तांबडे म्हणाले, ‘‘उशिरा म्हणजे १५ फेब्रुवारीनंतर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवू नये. जितका जास्त उशिरा ऊस तुटेल, तितकी खोडवा उत्पादनात घट होईल. खोडवा उसाचे व्यवस्थापन करताना पाचट जाळू नये. पाचट शेताबाहेर न काढता सरीत दाबून घ्यावे, बुडख्यावर पाचट ठेवू नये. बुडके मोकळे करावेत, जेणेकरून नवीन फुटणारे कोंब जोमदार येतील, त्यांना ऊन मिळेल. तसेच सरीत दाबून ठेवलेल्या पाचट व्यवस्थापनासाठी हेक्टरी ८० किलो नत्र, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे. त्यानंतर १० किलो पाचट कुजविणारे जिवाणू ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पसरून टाकावेत.’’ ‘‘उत्पादकता वाढीसाठी खोडवा व्यवस्थापन गरजेचे आहे,’’ असे प्रदीप गोंजारी यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com