Types Of Bee : मधमाशीपालनासाठी योग्य जाती

भारतामध्ये मधमाश्‍यांचे एकूण ५ प्रकार आढळून येतात. मधमाशीपालनाच्या दृष्टीने सातपुडी (एपिस सेरेना इंडिका) व युरोपियन मधमाशी (एपिस मेलिफेरा) या प्रजाती उपयुक्त व योग्य असतात.
Honey Bee
Honey BeeAgrowon
Published on
Updated on

डॉ. अमोल काकडे, डॉ. प्रशांत भोसले

भारतामध्ये मधमाश्‍यांचे (Bee) एकूण ५ प्रकार आढळून येतात. मधमाशीपालनाच्या (Beekeeping) दृष्टीने सातपुडी (एपिस सेरेना इंडिका) व युरोपियन मधमाशी (एपिस मेलिफेरा) या प्रजाती उपयुक्त व योग्य असतात.

मधपेट्या ठेवण्याच्या जागेतील

उपयुक्त वनस्पती

कडुनिंब, शेवगा, हादगा, जांभूळ, आंबा, लिंबू, बोर, संत्रा, मोसंबी, पेरू, चिंच, शिसम, अडुळसा, निरगुडी, कवट, आवळा, सेमल, रिठा, गुलमोहर, बेल, वेडीबाभूळ, सुबाभूळ, निलगिरी, तूर, मूग, कारळ, सूर्यफूल, तीळ, जवस, मोहरी, वाटाणा, चणा, कापूस, भेंडी, ओवा, जिरे, बडीशेप, मिरे, कोबी, फुलकोबी, गाजर, मुळा, कांदा, मोहरी, वांगे, टोमॅटो, गुलाब, ॲस्टर, झेंडू इत्यादी.

मधपेट्यांसाठी जागेची निवड

मधमाशीपालनामध्ये मधपेट्यांसाठी योग्य जागेची निवड ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मधपेट्या शेतामध्ये सावलीत, प्रवाही पाणी असलेल्या ठिकाणी ठेवाव्यात.

मुंग्या लागणार नाहीत, वाऱ्याचा सरळ झोत न येणारी, समपातळीत जमीन असलेल्या ठिकाणीच मधपेट्या ठेवाव्यात.

मधमाशीपालनास किमान ५ मधपेट्या ठेवून सुरुवात करावी. मधमाशीपालनाच्या योग्यपद्धतीची निवड करून व्यवसायास सुरुवात करावी.

Honey Bee
Honey Scheme : मधकेंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मधनिर्मिती

मधमाश्‍या फुलातील मकरंद किंवा गोड द्रवाचे जिभेने शोषण करतात. हा मकरंद पोटात साठविला जातो. माश्‍यांच्या लाळग्रंथीतून काही प्रारक मकरंदात मिसळतात आणि त्यातील शर्करेचे साध्या शर्करेत रूपांतर होते. नंतर हे मिश्रण चघळतात आणि तोच मध म्हणून मध साठवणी आणुकोषात साठविला जातो. जेव्हा मध परिपक्व होतो तेव्हाच मधमाश्‍या साठवण कोष सीलबंद करतात. इतरवेळी ती उघडीच असतात.

मेणनिर्मिती

मेण मधमाश्‍यांच्या शरीरामध्येच तयार केले जाते. मधमाश्‍या भरपूर प्रमाणात मकरंद परागकण इ. खातात आणि कित्येक तास पडून राहतात. शरीराच्या मागील बाजूच्या तळभागावर असलेल्या मेणग्रंथीद्वारे मेणाचा स्राव करतात. मधमाश्‍यांना थोडेसे मेण तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात मधाचे प्राशन करावे लागते.

जिवाणूजन्य रोग

अमेरिकन फाऊल ब्रुड

 बॅसिलस लारव्ही नावाच्या जिवाणूमुळे हा रोग होतो.

 अंड्यातून अळी बाहेर पडल्यापासून २४ तासांनंतर हा रोग येतो.

Honey Bee
Honey bees : मधमाशा का आहेत महत्वाच्या?

युरोपियन फाऊल ब्रुड

 बॅसिलस प्लुटॉन नावाच्या जिवाणूमुळे होतो.

 अळी अवस्थेत हा रोग होतो. अळ्या कोषावस्थेत जाण्यापूर्वीच मरतात.

विषाणूंमुळे होणारे रोग

कोष शिशू रोग

 सॅक ब्रुड या नावाच्या विषाणूंमुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

 कोषावस्था सुरू होण्यापूर्वी अळ्या रोगग्रस्त होतात व मरतात. अशा अळ्यांना मधमाश्‍या घरातून बाहेर काढतात व पेटीबाहेर नेऊन टाकतात.

Honey Bee
Beekeeping : कृषिकन्यांकडून मधमाशी पालनाबद्दल जनजागृती

प्रौढ माश्‍यांचे रोग

 नोसेमा (Nosema) हा रोग नोसेमा एपिस या एकपेशीय (अमिबा सारख्या) प्राण्यामुळे होतो.

ॲकराईन रोग (Acaine Disease) ः ॲकरपिस वुडी नावाच्या बारीक किड्यांमुळे हा रोग होतो.

मेणकिडा (Wax moth) ः हा मधमाश्‍यांचा प्रमुख शत्रू आहे. या किड्याचे लहान आणि मोठा असे दोन प्रकार आहेत.

सातपुडी मधमाशी (एपिस सेरेना इंडिका) संपूर्ण भारतात आढळते.

नेहमी अंधाऱ्या जागेत, झाडाच्या पोकळीत, दगडाच्या कपारीत, घराच्या पोकळीत, अडगळीच्या जागी, रिकाम्या मडक्यात, जुन्या टायरमध्ये, पाइपच्या तुकड्यात या माश्‍या आढळून येतात. एकमेकांना समांतर ७ ते ८ पोळी एका रांगेत बांधतात. त्यामुळेच त्यांना सातपुडी किंवा सातेळ नावाने ओळखले जाते.

आकाराने आग्यामाश्‍यांपेक्षा लहान व झुडपी माश्‍यांपेक्षा मोठ्या असतात.

माश्‍यांना अंधारात तसेच एकाच ठिकाणी काम करण्याची सवय असते.

माश्या शांत स्वभावी असून सहजरीत्या माणसाळतात. याच गुणवैशिष्ट्यामुळे कृत्रिम लाकडी पेट्यांमध्ये पाळता येतात.

पोळ्यातून वर्षाला एकावेळी साधारण ३ ते ४ किलो मध मिळतो.

युरोपियन मधमाशी (एपिस मेलिफेरा)

युरोप व इटलीमध्ये आढळून येते. जगभरामध्ये या माश्यांच्या वसाहतींचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे.

आकाराने आग्या मधमाश्‍यांपेक्षा लहान व सातपुडी मधमाश्यांपेक्षा मोठ्या असतात.

माश्‍यांची पोळी दगडाच्या कपारीत, अंधारात झाडांच्या ढोलीत आढळून येतात. रांगेमध्ये ७ ते १० पर्यंत पोळी बांधतात.

प्रतिवर्षी ३० ते ४० किलो मध प्रति पोळे तयार करतात.

अंधारात एकाच ठिकाणी जास्त दिवस राहण्याची सवय असल्याने त्यांचे कृत्रिम पालन केले जाते. भारतामध्ये या वसाहती युरोपमधून आयात करून आणलेल्या आहेत. या मधमाश्‍यांच्या वसाहती ठेवण्याकरिता ‘लँगस्ट्रॅथ’ मधुपेठ्या वापरल्या जातात.

झाडी, झुडपी किंवा लहान मधमाशी (एपिस फ्लोरिया)

या माशीला छोटी माशी असे म्हणतात. कारण ही माशी साधारण २० बाय १५ सेंमी एवढ्या लहान आकाराचे एकच मेणाचे पोळे बनविते.

पोळे झाडाच्या फांदीला, झुडपामध्ये किंवा इमारतीच्या भिंतीला आढळून येते.

पोळ्यामधून जास्त प्रमाणात मध मिळत नाही. प्रति वर्ष साधारण अर्धा किलो मध मिळतो.

या माश्‍या लाकडी पेट्यांमध्ये राहत नसल्यामुळे त्यांच्या पालनामध्ये अद्याप यश आलेले नाही.

डॉमर माशी (मेलिपोना /ट्रायग्रोना प्रजाती)

आकाराने इतर सर्व मधमाश्‍यांपेक्षा फारच लहान (डासांच्या आकाराएवढ्या) असतात.

डंख लहान व संरक्षणाच्या दृष्टीने कुचकामी असतो. तरीदेखील त्या पोळ्यांचे संरक्षण उत्तमरीत्या करतात.

पोळ्यातून एका वेळी ३० ते ५० ग्रॅम मध मिळतो. मध चवीला थोडासा आंबट, खारट व रंगाला काळपट.

पोळ्याची विशिष्ट रचना व फार कमी मध साठविण्याची क्षमता यामुळे मधमाशीपालनासाठी या जातीची निवड फारशी होत नाही. चावताना विशिष्ट प्रकारचा द्रव कातडीवर सोडतात. त्यामुळे अंगाची आग होते.

आग्या मधमाशी (एपिस डॉरसेटा)

या माशा आकाराने सर्वात मोठ्या असून स्थलांतर करणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांना पाळता येत नाही.

स्वभावाने रागीट आणि दंश करणाऱ्या असतात. दंश केल्यानंतर त्याजागी भयंकर आग होते.

उंच झाडे, इमारतीची छतावर, उंच पाण्याच्या टाक्यांवर मोठ्या आकाराचे एकच पोळे बांधतात. या माशांची मध गोळा करण्याची शक्ती अफाट असते.  एका पोळ्यातून एकाचवेळी साधारण २५ ते ३० किलो पर्यंत मध मिळतो. मात्र, आक्रमकता व स्थलांतर यामुळे व्यवसायिकदृष्ट्या संगोपनाद्वारे मध गोळा करणे शक्य नसते.

- डॉ. अमोल काकडे, ९४०४१४४५६५, (विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण विभाग, कृषी विज्ञान केंद्र, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com