Turmeric : शेतकरी नियोजन पीक : हळद

नांदेड जिल्ह्यातील उमरी व सावरगाव (ता. अर्धापूर) शिवारात तुकाराम रामजी गवळी यांची १५ एकर जमीन आहे. त्यापैकी ४ एकरामध्ये हळद, तीन एकरांत केळी बाग आणि आठ एकरांत ऊस पिकाची लागवड आहे.
Turmeric
Turmeric Agrowon
Published on
Updated on

शेतकरी ः तुकाराम रामजी गवळी

गाव ः उमरी ता. अर्धापूर, जि. नांदेड

एकूण क्षेत्र ः पंधरा एकर

हळद क्षेत्र ः चार एकर

नांदेड जिल्ह्यातील उमरी व सावरगाव (ता. अर्धापूर) शिवारात तुकाराम रामजी गवळी यांची १५ एकर जमीन आहे. त्यापैकी ४ एकरामध्ये हळद (Turmeric), तीन एकरांत केळी बाग (Banana Orchard) आणि आठ एकरांत ऊस पिकाची लागवड (Sugarcane Cultivation) आहे. तुकाराम यांचे वडील रामजी गवळी हे पारंपरिक पद्धतीने हळद लागवड करत होते. त्यात बदल करत तुकाराम यांनी १० वर्षांपासून बेडवर हळद लागवडीस (Turmeric Cultivation) सुरुवात केली. दरवर्षी साधारण ३ ते ४ एकरांवर हळद लागवड करतात. या वर्षी ४ एकरांत त्यांनी हळद लागवडीचे नियोजन केले आहे.

Turmeric
Turmeric Rate : मंदीतही हळदीचे दर टिकून

लागवड नियोजन

लागवडीपूर्वी संपूर्ण जमिनीची ट्रॅक्टरच्या साह्याने खोल नांगरट केली.

त्यानंतर कंपोस्ट खत ५ टन आणि शेणखत २ टन प्रति एकर प्रमाणे शेतामध्ये पसरून घेतले.

हळद लागवड गादीवाफ्यावर केली जाते. त्यासाठी साडेचार फूट अंतराचे गादीवाफे तयार करून जोडओळ पद्धतीने लागवड केली जाते. त्यासाठी दोन ओळींत दीड फूट तर दोन बेण्यात ९ इंच अंतर राखत झिकझॅग पद्धतीने लागवड केली.

लागवडीसाठी दरवर्षी सेलम जातीचे बेणे वापरले जाते. लागवडीपर्वी बेण्यास शिफारशीप्रमाणे रासायनिक आणि जैविक घटकांची प्रक्रिया केली.

लागवडीसाठी एकरी ८ क्विंटल प्रमाणे बेणे लागले.

लागवडीनंतर त्वरीत तणनाशकाची एक फवारणी घेतली.

लागवडीनंतर २० दिवसांनी ठिबकच्या नळ्या अंथरून सिंचनाची सोय केली.

Turmeric
Turmeric Market : हळदीचे उत्पादन यंदा वाढणार

खत व्यवस्थापन

डीएपी १ पोते, एमओपी अर्धा पोते, सूक्ष्म अन्नद्रव्ये ५ किलो या प्रमाणे खतांचा बेसला डोस दिली. ही खत मात्रा लागवडीपूर्वी १५ दिवस आधी दिली.

उगवणीनंतर ४५ दिवसांनी ठिबकद्वारे एनपीके खताची मात्रा दिली.

लागवडीनंतर ६० दिवसांनी १२:३२:१६ खताचा दुसरा डोस एकरी १०० किलो प्रमाणे दिला.

लागवडीच्या ९० दिवसांनंतर १३:४०:१३ हे खत २५ किलो, ०:५२:३४ हे विद्राव्य खत ५ किलो प्रमाणे दिली. ही मात्रा दर सात दिवसांनी आलटून-पालटून ३५ दिवसांपर्यंत दिली जाते.

कीड-रोग व्यवस्थापन

लागवडीनंतर ६० दिवसांनी कंदकुजीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा मेटाऱ्हायझीमचे द्रावण करून आळवणी केली. दर ८ दिवसांनी या द्रावणाची आळवणी केली.

पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बुरशीनाशकासह कीटकनाशकाची फवारणी घेतली.

कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण केले. आवश्कतेनुसार बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या तीन फवारण्या घेतल्या.

आगामी नियोजन

पीक लागवड होऊन ६ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

०:०:५० हे विद्राव्य खत एकरी २५ किलो प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे दिली जाईल.

साधारण १० जानेवारीनंतर पिकास पाणी देणे हळूहळू कमी केले जाईल. त्यानंतर फेब्रुवारी मध्यापर्यंत पूर्णपणे पाणी देणे बंद केले जाईल.

पिकाची पक्वतेची अवस्था पाहून हळद काढणीस सुरुवात केली जाईल.

दरवर्षी एकरी ३३ ते ३४ क्विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन मिळते.

- तुकाराम गवळी,

८८८८८ ८९३२७

(शब्दांकन ः कृष्णा जोमेगावकर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com